मुंबई

Breaking: मुंबईतील पोलिस उपायुक्ताला कोरोनाची लागण; वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील कोरोनाचा प्रभाव वाढत असताना त्याच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहेत.

संबधित अधिकारी आयपीएस दर्जाचा अधिकारी असून ग्रामीण भागातही एसपी म्हणून त्याने चांगली कामगिरी पार पाडली होती. तीन वर्षांपूर्वच मुंबईत बदली झाली होती. या अधिकाऱ्याच्या परिमंडळात अनेक कन्टेन्मेट झोन आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र ते तैनात होते. या अधिकाऱ्याचा जवळचा पोलिस कर्मचारी कोरोना संशयीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी स्वतःला स्वतःहून विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचा अहवाल प़ॉझिटीव्ह आल्याचे समजले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा अधिकारी आयपीएस दर्जाचा आहे.

राज्यात आता एकूण 422 पोलिस कोरोनााधीत आहेत. एकट्या मुंबईत 211 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पोलीस कर्मचा-यांचा  मोठ्या प्रमाणांत समावेश आहे. याशिवाय 51 पोलिस अधिका-यांही कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत तीन पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 49 कोरोना बाधीत पोलिस उपचार घेऊन घरी परतले  आहेत.
मुंबई पोलिसांनी नुकतीच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. सध्या मुंबईत 150कोरोनाग्रस्त पोलिस उपचार घेत आहेत.

आतापर्यंत 17 पोलिसांना कोरोनाची लागण 
हे उपायुक्‍त कार्यरत असलेल्या कंपाऊंडमध्ये आतापर्यंत 17 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे त्यानंतर या अधिकाऱ्याने  स्वतःची कोरोना  चाचणी केली त्यानंतर त्यांचाही आज अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त ३० मंडळांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT