Mumbai-Municipal
Mumbai-Municipal 
मुंबई

पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट गुलदस्त्यात

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महापालिका हद्दीतील जुन्या २७४ पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले आहे. दोन वर्षे उलटूनही त्याचा अहवाल सादर करण्याबाबत महापालिका प्रशासन चालढकल करत आहे. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर २७४ पुलांचा अहवाल आठवडाभरात सादर केला जाईल, असे प्रशासनाने म्हटले होते; मात्र अद्याप त्याला मुहूर्तच न सापडल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. 

मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण २७४ पूल आहेत. त्यातील काही ब्रिटिशकालीनही आहेत. २०१६ मध्ये २७४ पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यासाठी पालिका प्रशासनाने स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. पुलांचे पालिकेने सर्वेक्षण करून स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम पूर्णही केले. त्याचा अहवाल सहा महिन्यांत सादर करण्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र दोन वर्षांनंतरही अहवाल सादर झालेला नाही. त्यानंतर मेमध्ये पुलांचा अहवाल सादर करण्याचे जाहीर करण्यात आले होते. 

अंधेरीतील दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच जुन्या पुलांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला. त्यानंतर पालिकेची धावपळ उडाली. रेल्वेजवळील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय रेल्वे आणि पालिकेने घेतला. त्या वेळी पालिकेच्या हद्दीतील २७४ पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवालही आठवडाभरात सादर करण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. 

अहवालाविना पुलांची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती अडकली आहे. खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेवर टीका होत असताना पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने विरोधकही टीका करत आहेत. धोकादायक पुलांचे ऑडीट करून लवकरच दुरुस्ती करू, असे आश्‍वासन रेल्वेतर्फे देण्यात आले आहे. त्यानुसार काही ठिकाणचे पूल बंदही करण्यात आले आहेत. 

पालिकेच्या अखत्यारित असलेल्या सर्व पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल १० दिवसांत सादर करण्यात येईल. अहवालानंतर पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 
- शितलाप्रसाद कोरी, मुख्य अभियंता, पूल विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT