doval-ambedkar.jpg
doval-ambedkar.jpg 
मुंबई

 प्रकाश आंबेडकरांनी NSA अजित डोवालांकडे केली महत्त्वाची मागणी

दीनानाथ परब

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर, त्यांनी सचिन वाझेंना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. राज्यातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज राजभवनात येऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.  (bring sachin waze statement in publick domain praskash ambedkar demand to nsa ajit doval)

त्या चार हायप्रोफाईल आत्महत्या कि हत्या?
"राजकारण आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्य कारभार चालवतायत असं दिसतय. अनेक गावांमध्ये आदिवासींची हत्या केली जाते पण चौकशीही होत नाही. चार हायप्रोफाइल आत्महत्या झाल्याचं सांगण्यात आलय. पण वैद्यकीय माहितीनुसार या आत्महत्या नाहीत. दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत, मोहन डेलकर आणि मनसुख हिरेन या सगळ्यांच्या आत्महत्या दाखवण्यात आल्या. ही आत्महत्या आहे की, हत्या याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे" असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  (bring sachin waze statement in publick domain praskash ambedkar demand to nsa ajit doval)
 

2300 कोटी जमा करण्यात आले
पोलिसांचा वापर झाला आहे. पोलीस सांगतायत की, राजकीय व्यवस्थेने आदेश दिला. एका पत्रामधून महिन्याला १०० कोटी पक्षाकडे जमा  करण्यास सांगण्यात आले आहे.  २३०० कोटी रुपये जमा करण्यात आले.  कोणासाठी ही रक्कम जमा करण्यात आली. त्यात एक मंत्री असेल असं आम्हाला वाटत नाही. पक्ष स्तरावर की, मंत्रिमंडळ स्तरावर निर्णय झाला, याचा  शोध घेतला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

राष्ट्रपती राजवट आवश्यक 
राजकारण आणि प्रशासनाच्या गुन्हेगारीच एक नेटवर्क उभं राहिलं आहे. राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी ३५६ कलमाचा वापर करता येईल. हे घटनेचं अत्यंत महत्त्वपूर्ण कलम आहे. ज्यावेळेस प्रशासनाचं गुन्हेगारीकरण होतं, त्यावेळी हे हे कलम वापरलं गेलं पाहिजे. राज्यपालांनी त्या संदर्भातला अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावा. काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट आवश्यक आहे. सभागृह बर्खास्त करण्याची मागणी आम्ही करणार नाही. कारण काही चांगले आमदार सुद्धा आहेत. नवीन सरकार आलं तर, गुन्हेगारी घटकांना बाहेर ठेवता येईल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 
 

अजित डोवालांकडे केली मागणी
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल एनआयएचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे सचिन वाझे यांचे स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट त्यांनी लोकांसमोर आणावं, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT