BMC
BMC 
मुंबई

मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर पालिकेचा शिक्षण विभागाचा 2019-20 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए. एल. जऱ्हाड यांनी सोमवारी (ता.4) शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे सादर करण्यात आला. यंदा अर्थसंकल्पात 164.42 कोटींची वाढ झाली असून यंदा विशेष योजनांची भर केलेली दिसून येत नाही, गतवर्षीच्याच योजनांना या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मंडळ साठी प्राथमिक तरतूद 2.60 कोटी रुपये, विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य समृध्द करण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणी - 1.30 कोटी रुपये.
संगणक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्यय, टिंकर लॅब यामध्ये स्क्रॅच प्रोग्रामिंग, प्रिंटिंग इलेक्ट्रॉनिक रोबो मोबाईल अॅप विकसित करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी 1.42 कोटी निधी दिला आहे.
या वर्षी नव्याने विज्ञान कुतूहल भावांची उभारणी केली जाणार असून त्यासाठी 1.20 कोटी देण्यात येणार आहे, हे भवन पूर्व व पश्चिम उपनगरात होणार आहे.

2019-20 च्या अर्थसंकल्पात असणाऱ्या महत्वाच्या नवीन योजना 

दर्जेदार/आंतरराष्ट्रीय शाळा 2.60 कोटी ची तरतूद

भाषा प्रयोगशाळा 1.30 कोटींची तरतूद

पाचवी ते आठविच्या विद्यार्थ्यांसाठी टिंकर लॅब 1.42 कोटींची तरतूद

क्रीडा अकादमी सुरु करणार त्यासाठी 3.76 कोटींची तरतूद

संगीत अकादमीसाठी 86 लाखांची तरतूद

विद्यार्थांना सुट्टीमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी बालभवन ची निर्मिती 12 लाख तरतूद

शाळांचे मूल्यमापन 20 लाख तरतूद

विद्यार्थांना समुपदेशन सेवा 1 कोटी

विद्यार्थी थेट अनुदान योजना विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्टेशनरी वस्तूंची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँकेत जमा होणार 19.69 कोटींची तरतूद

खेळांची साधने 2 कोटी ची तरतूद

विज्ञान कुतूहल भवन 1.20 कोटी

जलद इंटरनेटसह नवीन दूरध्वनी जोडणी 35 लाख तरतूद

शाळा माहिती व्यवस्थापन नियंत्रण 80 लाख 

विशेष
शिवसेनेच्या महत्वाकांक्षी असलेल्या वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विन चे महत्व वाढवण्यासाठी दरवर्षी महापालिका विद्यार्थायची वार्षिक सहल पेंग्विन दर्शनासाठी विशेष निधी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT