bus
bus 
मुंबई

पालघर जिल्हयात बसला अपघात: अपघातात 11 प्रवासी जखमी 

प्रमोद पाटील

पालघर - तालुक्यातील टेंभी खोडावे-सफाळे बसला बुधवारी (ता.1) सकाळी आठच्या सुमारास मांजुर्ली येथे भीषण अपघात झाला असून, बस मधील अकरा प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. 

टेंभीखोडावे येथून सकाळी साडेसात वाजता सुटलेल्या टेंभीखोडावे- सफाळे बस क्रमांक MH20 D9707 या बसचे चालक सुदर्शन भातुकले यांनी समोरून येणाऱ्या वाहनाला साईट देताना बस घसरून रस्त्याच्या बाजुला पलटी झाली. विशेष म्हणजे या बसमध्ये 90 प्रवाशी होते. सुदैवाने रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडांमुळे बस बाजुला असलेल्या नाळयात न जाता अडकली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बसच्या पुढील काचा फोडून बाहेर काढण्यात आले. 

बसमधील प्रतिभा हाडळ (टेंभीखोडावे), अंकुश भोईर (जलसार) यांच्या सह अकरा प्रवाशांना डोकीला, हाताला किरकोळ मार लागला असून, त्यांना तातडीने सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT