byculla zoo google
मुंबई

भायखळा प्राणी संग्रहालय 'या' दिवसापासून पर्यटकांसाठी खुले

समीर सुर्वे

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (byculla zoo) 1 नाेव्हेंबरपासून पर्यटकांना खुले होणार आहे. सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत प्राणिसंग्रहालय खुले राहाणार आहे. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर (corona) रोज फक्त 10 हजार पर्यटकांना प्रवेश (tourist entry) दिला जाणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक राहणार (precautions compulsory) असून ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि पाच वर्षाखालील लहान मुलांनी शक्‍यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे किंवा विशेष काळजी घ्‍यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून (bmc) करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. यानंतर काही दिवसांतच वेगाने रुग्णवाढ सुरू झाल्याने 23 मार्च 2020 पासून देशभरातच लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले.

यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा 15 फेब्रुवारी 2021 पासून उद्यान पुन्हा पर्यटकांसाठी कोरोना खबरदारी घेऊन सुरू करण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी मोठी लाट आल्याने 4 एप्रिलपासून पुन्हा उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. आता सात महिन्यांनी 1 नोव्हेंबर पासून प्राणीसंग्रहालय पुन्हा पर्यटकांसाठी खुले होणार आहे.

हे नियम पाळावे लागणार

- मास्क शिवाय प्रवेश नाही

- खाद्यपदार्थ आणू नये.

- सोबत कमीत-कमी साहित्य आणावे

- साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद

- प्रवेशद्वाराजवळील सॅनिटायझरचा वापर करावा

- पिंजऱ्यांजळ प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये.

- प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.

- केरकचरा टाकू नये व थुंकू नये. कचराकुंडीचा वापर करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT