MBA
MBA 
मुंबई

एमबीएची प्रवेश प्रक्रिया रद्द; प्रवेशाचे नवे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील एमबीए/एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यस्तरीय कोट्यासाठी 85 टक्के जागा विचारात घेउन प्रवेश करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी) यापुर्वी राबवलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम फेरीचे जागा वाटप पूर्णपणे रद्द केले आहे. नव्याने राबविण्यात येणाऱ्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना 4 आणि 5 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरता येतील. तर प्रथम फेरीचे जागावाटप बुधवारी (ता.7) करण्यात येणार आहे. 

स्वायत्त दर्जानुसार संस्थेला जागावाटप व्हावे यासाठी मुंबईस्थित जमनालाल बजाज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेने न्यायालयात धाव घेतली होती. यावर निर्देश देताना न्यायालयाने संस्थेचा स्वायत्त दर्जा ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रवेश प्रक्रियेत राज्यस्तरीय 85 टक्के जागा विचारात घेउन प्रवेश करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे यापुर्वी सीईटी सेलने राबविलेली एमबीए/एमएमएसची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे रद्द केली आहे. 

पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयात जाउन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वीच्या फेरीत एआरसी सेंटरवर जाउन प्रवेशाचे शुल्क भरले आहे, त्यांनी पुन्हा एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग करण्याची आवश्‍यकता नसल्याचे, सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. तर दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांची माहिती 12 ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देण्यात येईल.

विद्यार्थ्यांना 13 आणि 14 ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील. त्यानंतर 16 ऑगस्टला दुसरी यादी जाहीर होईल. ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग केलेले नाही. त्यांना 17 आणि 18 ऑगस्ट या दिवशी एआरसी सेंटरवर जाता येईल. तर 17 ते 19 या कालावधीत महाविद्यालयात जाउन प्रवेश घेता येणार आहे.

तिसऱ्या यादीसाठी उपलब्ध जागांची माहिती 20 ऑगस्टला संकेतस्थळावर जाहीर होईल. यानंतर विद्यार्थ्यांना 21 आणि 22 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरता येतील. या प्रवेशाची तिसरी यादी 23 ऑगस्टला जाहीर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का! पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ स्वस्तात बाद

SCROLL FOR NEXT