प्रचारात शेवटपर्यंत हजेरी असल्यावरच मिळणार सुपारी
प्रचारात शेवटपर्यंत हजेरी असल्यावरच मिळणार सुपारी 
मुंबई

प्रचारात शेवटपर्यंत हजेरी असल्यावरच मिळणार सुपारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रचारात गर्दी दिसावी म्हणून मतदारसंघातील विविध मंडळांना निमंत्रण धाडले जाते. मंडळातील मंडळी येतातही, परंतु प्रचाराच्या सुरुवातीला डझनभर असलेली डोकी शेवटी मात्र चार-पाचच उरतात. त्यावर उपाय म्हणून प्रचाराच्या शेवटी हजेरी नोंदविण्याची पद्धत उमेदवारांनी सुरू केली आहे. हजेरी पाहूनच शेवटच्या दिवशी मंडळांना सुपारी दिली जाणार आहे. नेत्यांच्या सभेला गेल्याचे पुरावे म्हणून सभास्थळावरील सेल्फीही मागितले जात आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांवर गर्दी जमवण्याचे आव्हान असते. अशा वेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मदतीने विविध स्थानिक मंडळांच्या तरुणांना जमा केले जाते. त्यांना मतदानाच्या पूर्वसंध्येला पाकिटाचे प्रलोभन दाखवले जाते. मंडळाच्या सभासदानुसार पाकिटाचे वजन ठरते. मात्र, त्यातही आता प्रचाराला येणाऱ्या तरुणांच्या संख्येवर वजन ठरू लागले आहे. त्यावर उपाय म्हणून प्रचाराला सुरुवात होताना एका मंडळाकडून झडनभर तरुण उभे असतात. पण तासाभराने ती संख्या कमी होऊ लागते.

अनेक वर्षे असाच प्रकार सुरू होता. त्यावर आता उमेदवारांनी अनोखी कल्पना लढवली आहे. तरुणांची हजेरी नोंदविण्यासाठी एक वही तयार करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक मंडळाच्या नावाखाली प्रचाराच्या शेवटपर्यंत हजर असलेल्या प्रत्येक सदस्याचे नाव आणि सही घेतली जाते. हे सगळे नोंदवताना बाजूला या उमेदवाराचा निष्ठावंत कार्यकर्ता असतोच. त्यामुळे बनवाबनवीला फारसा वाव मिळत नाही.


उपस्थितीचे पुरावे लागणार
प्रचाराबरोबरच आता मुंबईत नेत्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. सभांना गर्दी जमवण्याची जबाबदारी त्या लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांवर असते. तरुणांना सभेला जाण्यास उमेदवार सांगतात, पण त्याचबरोबर पुरावा म्हणून सभेच्या ठिकाणी असल्याचे सेल्फीही मागितले जात आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT