Mumbai Crime News
Mumbai Crime News esakal
मुंबई

Crime News : मुंबईत 35 वर्षीय महिलेवर 75 वर्षीय व्यावसायिकाचा बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

व्यापाऱ्यानं महिलेला याची वाश्चता कुठंही न करण्यासाठी 'डी कंपनी'ची धमकी दिली होती.

मुंबई : जुहूमधील (Juhu, Mumbai) पंचतारांकित हॉटेलमध्ये 75 वर्षीय व्यावसायिकानं एका 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी व्यावसायिकावर अंबोली पोलिस ठाण्यात (Amboli Police Station) महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी पोलिसांनी ३७६(२) एन, ५०४ भादवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

विशेष म्हणजे, व्यापाऱ्यानं महिलेला याची वाश्चता कुठंही न करण्यासाठी 'डी कंपनी'ची धमकी दिल्यानं पोलिस कामाला लागले आहेत. 1993 च्या मुंबईसाखळी स्फोटाचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचं नाव समोर येताच हत्या, खंडणी, धमकी, जिवे मारण्याचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यांचा पाडाच वाचला जातो. मात्र, बलात्काराच्या एका गुन्ह्यात चक्क दाऊदच्या नावानं धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय.

अंबोली पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय लेखिकेनं दिलेल्या तक्रारीनुसार, दादरमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय व्यावसायिकानं तिच्यावर अंधेरीच्या जेबीनगर येथील सन अॅण्ड शील (आताचे नाव द ऑन टाईम हॉटेल) इथं मे महिन्यात वेळोवेळी अत्याचार केले आहेत. याच दरम्यान व्यावसायिकानं तिच्याकडून 2 कोटी व्याजानं घेऊन ते परत न केल्याचाही दावा केलाय. या पैशासाठी, त्याच बरोबर महिलेवर केलेल्या अत्याचारबाबत महिलेनं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, व्यावसायिकानं महिलेला थेट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावानं धमकावलंय. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडं (MIDC Police) वर्ग केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT