CBI raids in 91 places across country including Mumbai Doctor inquiry esakal
मुंबई

Mumbai News : मुंबईसह 91 ठिकाणी देशभरात सीबीआयची छापेमारी

वैद्यकीय परिषदेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण न करता परदेशातून पदवी घेऊन भारतात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या चौकशी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सीबीआयने गुरुवारी देशभरात 91 ठिकाणी छापेमारी केली आहे . अनेक राज्यातील वैद्यकीय परिषदेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण न करता परदेशातून पदवी घेऊन भारतात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या चौकशी संदर्भात ही छापेमारी करण्यात आली.

दिल्ली, मुंबई,पुणे,नागपूर, जयपूर, पाटणा , चंदिगढ, श्रीनगर जम्मू अशा 91 ठिकाणी गुरूवारी सीबीआय अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.सीबीआयने कथित भ्रष्टाचार, गुन्हेगारी कट, फसवणूक आणि राज्य वैद्यकीय परिषद, तत्कालीन वैद्यकीय परिषद आणि 73 परदेशी वैद्यकीय पदवीधरांच्या अज्ञात अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने 14 राज्यतील वैद्यकीय परिषद आणि 73 परदेशी वैद्यकीय पदवीधारकांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत . या आरोपींना अनिवार्य परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) उत्तीर्ण न करता भारतात डॉक्टर म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती.

राष्ट्रीय परीक्षा मंडळानेही आरोग्य मंत्रालयाला माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रशिया, युक्रेन, चीन आणि नायजेरियासह विविध देशांतील 73 एमबीबीएस वैद्यकीय पदवीधरांन एफएमजी परीक्षेत उत्तीर्ण झाले नव्हते.

यानंतर सीबीआयने छापेमारी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. नियमांनुसार, परदेशी वैद्यकीय पदवीधरांना भारतात सराव करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग किंवा राज्य वैद्यकीय परिषदेकडे तात्पुरती किंवा कायमस्वरूपी नोंदणी मिळविण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT