Oilseeds sakal media
मुंबई

"तेलबिया, तेल, कडधान्यांना वायदे बाजार प्रतिबंध स्वागतार्ह"

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे मत

कृष्ण जोशी

मुंबई : अनेक प्रकारच्या तेलबिया (Oilseeds) ,कडधान्ये (Cereals) व काही खाद्यतेलांच्या (Edible oil) वायदे बाजारातील व्यवहारांना (forward Market dealing) प्रतिबंध करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे (central government decision) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (Maharashtra chamber of commerce industries and agriculture) ने स्वागत केले असून यामुळे तेलांची कृत्रिम भाववाढ रोखली जाईल असे मत व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने नुकतेच या वस्तूंच्या वायदे बाजारातील व्यवहाराला प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वायदेबाजारातील कृत्रिम व्यवहारांमधून ठराविक लोकच कोट्यवधी रुपयांचा नफा कमवतात व दुसरीकडे काही लोकांना मोठा फटका बसतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

वायदे बाजारातील व्यवहारांमुळे जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ, तेलबिया आदी वस्तूंच्या दरावर देशातील मोठे भांडवलदार त्यांच्या सोयीनुसार नियंत्रण ठेवतात. त्यामुळे कडधान्य, तेल, तेलबियांच्या किमती अनियंत्रित होऊन अनेक वेळा कृत्रिम भाववाढ झालेली बघायला मिळाली आहे. आता ही बाब टळेल तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळेल, असेही गांधी यांनी म्हटले आहे.

ज्यावेळी नवीन पिक बाजारात यायची वेळ होते त्यावेळी सट्टेबाज या पिकाचे दर पाडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते व नंतर तेलबिया, तेल व कडधान्यातील कृत्रिम भाववाढीमुळे व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसतो. आता व्यापाऱ्यांना स्थैर्य मिळण्याबरोबरच तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे ग्राहकांनाही फायदा होणार आहे. वायदे बाजारात प्रत्यक्ष वस्तूंची देवाणघेवाण न होता निव्वळ तेजी-मंदी खेळली जाते. त्यामुळे केंद्राने खरे तर सर्व प्रकारच्या वायदे बाजाराला पूर्णपणे प्रतिबंध घालण्याची गरज आहे अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT