Mumbai-Local 
मुंबई

मध्ये रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका! पाहा किती केली वसूली

सकाळ वृत्तसेवा, कुलदीप घायवट

मुंबई: गेल्या वर्षभरापासून राज्याला कोरोनाने ग्रासले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा काही काळ सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता हळूहळू सामान्य जनतेसाठी ही लोकलसेवा ठराविक वेळेपुरती सुरू करण्यात आली आहे. याचदरम्यान, मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारल्याचं स्पष्ट झाले आहे. मध्य रेल्वे मार्गावरून विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या सुमारे 3 लाख प्रवाशांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडून मध्य रेल्वेने 10 कोटी 4 लाखांचा दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 15 जून 2020 ते 21 मार्च 2021 पर्यंत उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये सखोल व नियमित तिकीट तपासणी मोहीम चालविली. या तपासणी दरम्यान, विनातिकीट  आणि अनियमित प्रवाशांची 3 लाख 2 हजार प्रकरणे आढळून आली. त्यांच्याकडून 10 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. यापैकी सुमारे 2 लाख 25 हजार प्रकरणे ही उपनगरीय लोकलमधून आढळली. ज्यातून दंड म्हणून सुमारे 6 कोटींची वसूली करण्यात आली. तर लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमधून ७५ हजार प्रकरणांद्वारे ४ कोटींचा दंड वसूल करण्यात आला.

मध्य रेल्वे मार्गावरून अधिकृत तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने विनातिकिट आणि अनियमित तिकिट घेऊन प्रवास करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. अधिकृत तिकिट काढणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक होण्यासाठी तिकिट तपासणी केली जात असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

महिना विना तिकीट प्रवासी संख्या दंड वसूली
जानेवारी 2021 65 हजार 140 1 कोटी 90 लाख रुपये
फेब्रुवारी 2021 79 हजार 251 2 कोटी 66 लाख रुपये
मार्च 2021 62 हजार 873 2 कोटी 42 लाख रुपये


(संपादन - विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT