central Railway motorman stops train to urinate on the tracks video viral
central Railway motorman stops train to urinate on the tracks video viral 
मुंबई

मोटरमनची करामत; मध्येच रेल्वे थांबवून रुळावर केली लघुशंका

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईत काय होईल याचा नेम नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेल्या लोकलमधून उतरुन मोटरमनने लोकसमोर लघुशंका उरकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. या सगळ्या प्रकाराचा एका नेटकऱ्याने व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केलाय. 

या प्रकरणी काहींनी मोटरमनवर कारवाईची मागणी केली. तर लघुशंका ही नैसर्गिक नसल्यानं कारवाईची तरतूद नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं. 


उल्हासनरमधून सीएसएमटीकडे जाणारी लोकल काल दुपारी अडीचच्या सुमारास रवाना झाली. मात्र, श्रीराम चौक उड्डाणपुलाजवळ अचानक लोकल थांबली. सिग्नल नसतानाही लोकल थांबवण्यात आल्यानं दरवाज्यात उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांना आश्चर्य वाटलं. लोकल थांबवल्यानंतर मोटरमन खाली उतरला. लोकलच्या अगदी समोरच त्यानं लघुशंका केली. यानंतर मोटरमन लोकलमध्ये चढला आणि त्यानं लोकल सुरू केली. 

यावर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी याबद्दल संताप व्यक्त केला. तर अनेकांनी इतक्या लांब पल्ल्याच्या गाड्या चालवत असलेल्या मोटरमननं अशा वेळी करावं तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT