महाड : तालुक्‍यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना केंद्रीय पथकाचे अधिकारी.  
मुंबई

केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

महाड (बातमीदार) : महाडसह संपूर्ण राज्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. यामध्ये सांगली आणि कोल्हापूरला तर मोठा फटका बसला. या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्‍यालाही फटका बसला होता. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक तब्बल दोन आठवड्यानंतर महाडमध्ये दाखल झाले आहे. या पथकाने घाईघाईनेच महाड शहर, वरंध घाट आणि शेवते या ठिकाणी पाहणी केली. 

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पूर आला होता. नागोठणे, पेण, रोहा, पालीसह महाड तालुक्‍यात ऑगस्टमध्ये अतिवृष्टी सुरूच होती. अतिवृष्टीमुळे महाड शहरासह महाड औद्योगिक क्षेत्र, शहराजवळील गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठी वित्तहानी झाली होती. शहरातील व्यापारी आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने सामानांचे नुकसान झाले. 
तालुक्‍यातील भातशेतातही पुराचे पाणी शिरल्याने ३ ते ४ हजार हेक्‍टर भातशेती कुजून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सरकारी यंत्रणेकडून झाले असले, तरी अद्याप मदत दिली गेलेली नाही. त्यातच सरकारच्या ४८ तासांच्या अटीमुळे मदत मिळणे जवळपास कठीण होऊन बसले आहे. 

या नुकसानग्रस्त भागाची पाहणी गुरुवारी केंद्रीय पथकाकडून करण्यात आली. या पथकाने महाड शहरातील काही भागांत जाऊन दुकानदारांबरोबर चर्चा केली. 
शहरात आलेल्या पुराच्या पाणीपातळीची नोंदही त्यांनी घेतली. या केंद्रीय पथकाबरोबर रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, महाड तहसीलदार चंद्रसेन पवार हेदेखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT