मुंबई

ठाणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी डॉ. दांगडे; शुक्रवारी पदभार स्विकारला

राहुल क्षीरसागर


ठाणे  : ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते रायगड येथे जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. 

प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. दांगडे हे भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आहेत. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाचे रहिवासी आहेत. त्यांनी मुंबई येथून बी.व्ही.एस.सी. अँड एच. ही पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी यापूर्वी जळगाव आणि श्रीरामपूर प्रांत अधिकारी, उप जिल्हाधिकारी (रोहयो) धुळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अहमदनगर, निवासी उपजिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक म्हणून सेवा बजावली आहे. 2011 साली त्यांना पदोन्नती मिळून ते अप्पर जिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, म्हाडा येथे सेवा बजावली. त्यानंतर उपायुक्त (महसूल) कोकण विभाग आणि अध्यक्ष जात पडताळणी समिती म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे.

आता ते जिल्हा परिषद ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झाले आहेत. प्रशासकीय कार्यकाळात त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, 1 ऑगस्ट 2002 रोजी पहिल्या महसूल दिनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. 

As the CEO of Thane Zilla Parishad dr dangade
--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT