ठाणे : मेट्रो कामात बाधीत होणारे चाफ्याचे वृक्ष (छायाचित्र : दीपक कुरकुंडे) 
मुंबई

मेट्रोच्या कामामुळे चाफ्याचा सुगंध हरपला 

दीपक शेलार

ठाणे : ठाण्यातील चाफ्याच्या अनेक वृक्षांवर मुंबई ते ठाणे या मेट्रो-4 च्या कामामुळे गंडांतर आले आहे. पूर्वद्रुतगती महामार्गावरील रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये छोटेखानी बगीच्यात रांगेने लावलेल्या चाफ्यांच्या वृक्षांवर थंडीच्या मोसमात बहरणारी फुले वाहन चालकांना आकर्षित करीत असत. मेट्रोसाठी ही वृक्षच मुळासकट उखडून फेकून दिल्याने महामार्गवरील चाफ्याचा दरवळ कायमचा हरपला आहे. रखरखत्या उन्हात रस्त्याच्या दुतर्फा वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांमधील प्रवासी आणि चालकांना मोहून टाकणारी ही चाफ्याची वृक्षे मेट्रोच्या कामात बाधित झाल्याने पर्यावरण मित्रांसह अनेक वाहनचालकांनी निराशा व्यक्त केली आहे. 

ठाण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी पूर्वद्रुतगती महामार्ग असून या हमरस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता घोडबंदर रोडला जोडलेला असल्याने वाहनांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी हा रस्ता एमएसआरडीसीकडे (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) होता. सध्या या रस्त्याची जबाबदारी पीडब्लूडीकडे (सार्वजनिक बांधकाम विभागाकडे) आहे.

मात्र, या रस्त्याच्या साफसफाईचे तसेच देखभालीचे काम ठाणे महापालिकेमार्फत केले जाते. पालिका हद्दीतून जाणाऱ्या या मार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने शेकडोच्या संख्येने चाफ्याची फुलझाडे लावली होती. ऐन थंडीच्या मोसमात या फुलझाडांना बहर येऊन महामार्गावर चाफ्याच्या फुलांचा दरवळ सुटत असे. मात्र, मेट्रो-4 च्या कामामुळे अनेक वृक्षांवर कुऱ्हाड पडली असताना यात रस्ता दुभाजकामध्ये लागवड केलेली चाफ्याची शेकडो वृक्षही नष्ट करण्यात आली आहेत. 

वृक्ष पुनर्रोपणाचा पर्याय 
मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांवरून रणकंदन माजले असतानाच बाधित वृक्षांच्या पुनर्रोपणाचा पर्याय महापालिकेने सुचविला आहे. यासाठी "ट्री प्लॅन्टेशन' ही वृक्ष पुनर्रोपणाचे यंत्र पालिकेने घेतले असून बाधित वृक्ष जसेच्यातसे पुनरोपण करण्यासाठी एमएमआरडीएला हे यंत्र भाड्याने देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या तब्बल 60 वृक्षांचे पुनर्रोपण पालिकेने अशाप्रकारे केले होते. तेव्हा, मेट्रोमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांनाही अशाचप्रकारे जीवदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

मुंबईला जाण्यासाठी पूर्वद्रुतगती महामार्ग हा जलदगती मार्ग असून याच रस्त्यावरून लोकप्रतिनिधी, मंत्री-संत्री आणि राजकीय नेत्यांसह इतर वाहनचालकांची नियमित ये-जा सुरू असते. हा हमरस्ता उभारल्यानंतर रस्त्याचे सुशोभिकरण करताना दुभाजकामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लावलेल्या फुलझाडांमुळे प्रवासातील क्षीण नाहीसा होण्यास मदत होत असे. आता ही झाडे तोडल्याने चाफ्याचा सुगंध येणार नाही. 
-नामदेव पाटील, 
वाहन चालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Marathi News Live Updates : सीएसएमटी स्थानकातील वायफायवर सायबर हल्ला

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT