raj-and-chhagan 
मुंबई

उत्तरसभेनंतर छगन भुजबळांचे पुत्र राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना उधाण

भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचे चिरंजीव पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांनीदेखील राज ठाकरे यांच्या शीवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी कालच्या ठाण्यातील उत्तर सभेत छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी पंकज भुजबळ हे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या दोघांमधील भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. (Pankaj Bhujbal Meet Raj Thackeray)

ठाण्यात काल राज ठाकरे यांची उत्तर सभा (MNS Uttar Sabha) पार पडली. यामध्ये त्यांनी जयंत पाटील, अजित पवार, संजय राऊत, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. सभेत त्यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल करत म्हणाले होती की, भुजबळ यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे भुजबळांना जेलमध्ये जावे लागले. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिले नेते भुजबळ होते, अशी जोरदार टीका राज यांनी केली होती.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या सबेनंतर आज त्यांच्या निवास्थानी अनेक पक्षांच्या नेत्यांची ये-जा वाढली असून, उत्तर सभेच्या दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि त्यांच्या पत्नी हेदेखील राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना नुकताच नातू झालेला आहे. त्यामुळे ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे.

कालच्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले होते

गुढीपाडवा मेळाव्यानंतर अनेकांनी तारे तोडले होते. त्यांना उत्तर देण्यासाठी आजची सभा आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगावर टीका ही भाजपची स्क्रिप्ट कशी, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला. ईडीच्या कारवाईच्या भीतीमुळे ट्रॅक बदलला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. मला ट्रॅक बदलण्याची गरज नाही. कुठल्याही नोटिसांना मी भीक घालत नाही, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

नरेंद्र मोदी (Narendra modi) पंतप्रधान व्हावे हे म्हणणारा मी पहिला माणूस आहे. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द केलं तेव्हा मीच पहिल्यांदा ट्विट करून अभिनंदन केले होते. त्यांनी चांगले काम केले म्हणून अभिनंदन केले. काही चुकीचे केले तर नक्की मोदींवरही (Narendra modi) बोलेल, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा भाजीपाला, फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT