चोपडीपूजन केवळ नावापुरते!
चोपडीपूजन केवळ नावापुरते! 
मुंबई

चोपडीपूजन केवळ नावापुरते!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर चोपडीपूजनाला व्यापारी जगतात विशेष महत्त्व आहे. मात्र, संगणकाच्या वाढत्या वापरामुळे गेल्या काही वर्षांत चोपडीपूजन केवळ नावापुरतेच शिल्लक राहिले आहे. संगणकाच्या वेगवेगळ्या प्रणालींमुळे एका क्‍लिकसरशी सर्व व्यवहार संगणकात जतन केले जातात; मात्र असे असले तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोपडीपूजनाची परंपरा व्यापारी आजही पाळतात. चोपड्या या केवळ देण्या-घेण्याच्या आर्थिक व्यवहारापुरत्या मर्यादित आहेत. यात काळ्या पैशांचीच जास्त नोंद होत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

नवी मुंबईतील पाच घाऊक बाजारपेठांना आशिया खंडातील सर्वात  मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दहा ते बारा हजार व्यापारी व्यापार करतात. तीन हजार कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल असलेल्या या बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणाऱ्या चोपडीपूजनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजारपेठेत संगणक वापराचे प्रमाण वाढल्यानंतर ही वही काहीशी अडगळीत पडल्यासारखे वाटते. गेली अनेक वर्षे या चोपडीशिवाय व्यापाऱ्यांना दुसरा पर्याय नव्हता. 

त्यामुळे चोपडी तयार करणाऱ्या प्रिंटर्सला एक वेगळे महत्त्व होते. एखाद्या व्यापाऱ्याकडे एकाच हिशेबाच्या दोनपेक्षा जास्त वह्यादेखील ठेवल्या जात होत्या. त्यामुळे दिवाळीत पाच ते सहा हजार रुपयांची चोपडीखरेदी प्रत्येक व्यापारी करीत असल्याचे चोपडी व्यापाऱ्यांनी सांगितले. ही खरेदी आता ५० टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. संगणक बाजारात आल्यापासून सर्व व्यापाऱ्यांचे व्यवहार या संगणकाद्वारे केले जात आहेत; मात्र दिलेली उधारी, कर्ज किंवा घेतलेले कर्ज आणि काळ्या बाजारात विकलेला माल याची नोंदही या चोपडीत केली जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांना चोपडीशिवाय दुसरा पर्याय नाही हे दिसून आले आहे.

काय आहे चोपडीपूजन?
चोपडीपूजन लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर केले जाते. या दिवशी आजूबाजूचे सात आठ व्यापारी एकत्र येऊन ही पूजा करतात. या दिवसापासून चोपडीमधील नोंदी नव्याने करण्यास सुरुवात केली जाते. या दिवशी व्याजाने दिलेले पैसे परत घेण्याची प्रथा आहे.

मित्रमंडळी, नातेवाईक, व्यापारी एकत्र येऊन चोपडीपूजन करतात. हे पूजन मुहूर्त बघूनच केले जाते. दोन ते तीन तासांचे हे पूजन व्यापाऱ्यांना एक नवीन ऊर्जा देणारे ठरते.    
- हितेन जोशी, व्यापारी, मसाला मार्केट, एपीएमसी.

काही वर्षांपासून चोपडीविक्री कमी झाली. यापूर्वी पाच ते सहा हजार रुपयांची चोपडी घेणारे व्यापारी आता अर्धी खरेदी करीत आहेत. पण चोपडीपूजनासाठी नवीन चोपडी खरेदीशिवाय व्यापाऱ्यांपुढे दुसरा पर्याय नाही. चोपडीपूजनाबरोबर काही व्यापारी आता संगणकाची पूजादेखील करतात.    
- कुणाल शाह, स्वस्तिक बुक डेपो, एपीएमसी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीला दुसरा मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT