मुंबई

सिडकोतील कामगार नेत्यांची दलाली रडावर; दक्षता विभागाने माहिती मागवली 

सुजित गायकवाड

नवी मुंबई  : सिडकोच्या विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व स्वयंघोषीत कामगार नेते यांच्यातर्फे साडेबारा टक्के विभागात सुरू असलेली दलाली आता अडचणीत आली आहे. सिडकोच्या दक्षता विभागाने विकसकांची एजंटचे काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती मागवली आहे. साडेबारा टक्के योजने अंतर्गत सर्वे विभागातील अधिकाऱ्यांंना अशा प्रकारच्या सूचना दक्षता विभागाचे तपास अधिकारी अब्दूल शेख यांनी दिल्या आहेत. 

राज्यातील श्रीमंत महामंडळांपैकी एक म्हणून सिडको सुपरिचीत आहे. खाजगी विकसकांनी नवी मुंबईत उभारलेल्या इमारतींच्या जाळ्यांमुळे सिडकोत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. सिडकोचे काही अधिकारी शेतकऱ्यांना भीक घालत नाहीत. आपल्याला मिळणारा हिस्सा अधिकाऱ्यांना मिळत असल्याने सिडकोत एजंट वर्ग उदयास आला आहे. सिडकोचा साडेबारा टक्के विभाग एजंटमुळेच बदनाम झाला आहे. अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यातही सापडले आहेत. सिडकोला लागलेला हा बदनामीचा डाग धुवून काढण्यासाठी दक्षता विभागाने मोहीम आखली आहे. या मोहीमेअंतर्गत साडेबारा टक्के विभागाच्या सर्व्हे विभागाकडे शेतकऱ्यांंसाठी दाखले आणण्यासाठी सिडकोच्या कामगार युनियनचे पदाधिकारी फेऱ्या मारत असल्याची तक्रार दक्षता विभागाला प्राप्त झाली आहे. कामगारांचे नेते असल्याचे भासवून टेबल ते टेबल फिरून ना बांधकामे दाखले घेऊन इरादापत्रक पूर्ण करून विकसकाला देत आहे. अशा स्वरूपाच्या तक्रारीची दखल घेत दक्षता विभागाने सर्व्हे विभागीत अधिकाऱ्यांना दाखल्यांच्या कामासाठी येणाऱ्या सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे व माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दक्षता विभागाच्या या आदेशामुळे साडेबारा टक्के विभागातील एजंट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. 

ही मागितली आहे माहिती 

ना बांधकामे दाखले घेण्यासाठी सिडकोतील कर्मचारी तसेच नेते मंडळींचा आपल्या विभागात वावर असतो का, विकासकातर्फे कामे करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे का, येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांची नावे आणि संबंधित फाईल क्रमांक आदी माहिती दक्षता विभागाला सादर करावी. 

कारवाई की फक्त फार्स

सिडकोत फोफावलेल्या भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी याआधी देखील अनेक दक्षता अधिकाऱ्यांनी मोहीमा आखल्या होत्या. परंतू या मोहीमांतून काही ठोस कारवाया न झाल्याने त्या दिखाव्यापूरत्याच ठरल्या. आता पुन्हा दक्षता विभागाने एजंट कर्मचाऱ्यांविरोधात मोहीम आखली आहे खरे, परंतू एजंटला मिळणाऱ्या मलईत या अधिकाऱ्यांनाही वाटा मिळतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे दक्षता विभागालाही माहिती मागवल्यानंतर कोणीच माहिती न दिल्यामुळे पुन्हा स्मरणपत्र द्यावे लागले आहे.

CIDCOs labor leaders exposed The vigilance department called for information

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT