मुंबई

Loksabha 2019 : लोकसभा निवडणुकीतही "नोटा'चे अस्त्र उपसणार? 

मयूरी चव्हाण-काकडे

कल्याण - निवडणुकीची रणधुमाळी पेटली असून मतदान जनजागृतीही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नकाराचा अधिकार हा नवीन पर्याय उपलब्ध झाल्यामुळे नागरिक आता या पर्यायाचाही वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात कल्याण ग्रामीणमध्ये सर्वाधिक नोटाचा वापर केला गेला होता. या परिसरातील नागरिक कल्याण-डोंबिवलीच्या जवळ असले, तरी पाणी, रस्ते आणि जमिनीच्या मुद्द्यांवरून नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. लोकसभा निवडणुकीतही आपला रोष व्यक्त करण्यासाठी "नोटा'चा वापर केला जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागात भूमिपुत्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मागील निवडणुकीत येथून शिवसेनेचा विजय झाला असला, तरी तब्बल 7 हजार 835 मतदारांनी कल्याण ग्रामीणमधून नोटाला पसंती दिली होती. आता या भागात होऊ घातलेले ग्रोथ सेंटर, भूमिपुत्रांना नाकारल्या जाणाऱ्या बांधकाम परवानग्या, पाणी, रस्ते आणि 27 गावांच्या स्वतंत्र नागरपालिकेचा प्रश्न यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. कल्याण लोकसभेत येणाऱ्या वसार गावाने तर निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. एकीकडे शहरी भागातील मतदार मतदानाकडे पाठ फिरवत असताना ग्रामीण भागातील मतदार मात्र नोटाच्या स्वरूपात आपल्या मतदानाचा हक्क बजावत असल्याचे दिसून येते. मुरबाड विधानसभा मतदारसंघातही 3 हजार 394 मते नोटाला मिळाली होती. 

विधानसभेची रंगीत तालीम 
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे येथून शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळणाऱ्या मतांवरून येथील नागरिकांचा कल कोणाकडे असणार, हे स्पष्ट होणार आहे. भविष्यात हा परिसर कात टाकणार असून बड्या राजकीय मंडळींनाही हा परिसर खुणावत आहे. ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असणार आहे. येथून राष्ट्रवादीला चांगली मते मिळाली तर विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादीत "कॉंटे की टक्कर' होऊ शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील साबळेवाडी, शिंदेवाडी, खुपिरे परिसरात २४ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबलची चोरी

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT