Air India
Air India 
मुंबई

Air India Penalty: एअर इंडियाला दणका! वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी तब्बल ३० लाखांचा दंड

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मुंबई विमानतळावर व्हिलचेअर न मिळाल्याने एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) एअर इंडियाला दणका दिला आहे. डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. ( Civil Aviation imposed financial penalty Rs 30 lakhs on Air India after an incident of non availability of a wheelchair old passenger)

वृद्ध जोडप्याला मुंबई विमानतळावर व्हिलचेअर हवे होते. मात्र, त्यांना एकच व्हिलचेअर मिळाले. वृद्ध व्यक्तीने आपल्या पत्नीला व्हिलचेअरवर बसवले. त्यांना विमानापासून खूप अंतर चालावे लागल्याचं सांगितलं जातं. यातच ते पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात होता. एअर इंडियाने दोघांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करायला हवी होती असा सूर लोकांचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध जोडप्याने तिकीट काढतानाच व्हिलचेअरची मागणी केली होती. तसेच यासाठीचे शुल्क देखील भरले होते. असे असताना त्यांना एकच व्हिलचेअर देण्यात आली. दोघेंही वृद्ध होते, अशा स्थितीत त्यांना विमानापासून खूप अंतर चालावं लागलं. थकल्यामुळे त्यांना भोवळ आली आणि ते खाली पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.

याप्रकरणी नागरी विमान वाहतूक प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. एअर इंडियाला या प्रकरणी ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडामुळे व्यक्तीचं आयुष्य परत मिळणार नसलं तरी अशा हलगर्जीपला चाप लागेल अशी आशा आहे. (Latest Maratahi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

Virat Kohli on Chris Gayle : RCBमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल? विराट कोहलीने दिली ऑफर

Healthy Diet For Kids : मुलांच्या निरोगी वाढीसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, मिळतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT