CM eknath shinde target now shiv sena bhavan uddhav thackeray politics mumbai  sakal
मुंबई

शिंदे गटाचे लक्ष्य ‘शिवसेना भवन’ ?

शिवसेनेतील बंडाळी : स्वतंत्र नोंदणीवेळी डावपेच आखण्याची शक्यता!

संजय मिस्कीन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दमदार बंड उभारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पुढचे लक्ष्य ‘शिवसेना भवन’ वर ताबा करण्याचे असेल, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. दादर येथे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. स्वतःचीच शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. दोन तृतीयांश आमदारांना गटात खेचण्यात यश आलेल्या शिंदे यांनी आता गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांना गटात सामावून घेण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यातच विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी स्वतःची निवड करताना आता शिवसेनेच्या राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणीतदेखील मोठी फूट पाडण्याची यशस्वी रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. आजच एकनाथ शिंदे याची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली असून त्यांनी स्वतःच्या गटाचे नेते, उपनेते आणि प्रवक्ते पदाच्या नेमणुका केल्या आहेत.

तर ज्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून हकालपट्टी करण्यात आली, त्यांना शिंदे यांनी पुन्हा जिल्हाप्रमुख म्हणून नेमले आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये शिंदे यांनी दोन तृतीयांश फूट पाडली तर संपूर्ण पक्षाचा ताबा, कार्यालये आणि नेमणुकांचे अधिकार घेण्यात शिंदे यांना अडथळा येणार नाही असे जाणकारांचे मत आहे. तूर्तास शिंदे यांना पदाधिकाऱ्यांना नेते, उपनेते पदावर नेमण्याचा अधिकार नसला तरी तसे घडताना दिसत असून अखेरचा पर्याय म्हणून ‘शिवसेना भवन’ वर दावा करून पक्षाचे मुख्यालय ताब्यात घेण्याचा ते प्रयत्न करतील, असे राजकीय आडाखे बांधले जात आहेत.

घटनात्मक बंधनाचे अडथळे

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःसोबतचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या पाठिंब्यावर मूळ शिवसेनेवर दावा सांगत असले तरी पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे होच पक्षप्रमुख आहेत. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि हाकालपट्टीचे सर्वाधिकार ठाकरे यांच्याकडेच आहेत. हे सर्वाधिकार शिंदे यांना स्वतःकडे घ्यायचे असतील तर त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदावर अविश्वास आणावा लागेल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र विधीमंडळातील स्वतंत्र गटाची नोंदणी यशस्वी झाल्यास विधानभवनमधील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा पूर्ण ताबा होवू शकतो. पण पक्ष म्हणून संपूर्ण शिवसेनेवर पक्षाची घटना आणि पक्षचिन्ह यावर शिंदे यांना ताबा मिळवायचा असेल तर पक्षाचे मुख्यालय हे त्यांना कार्यालयीन कामकाजाचे मुख्यालय म्हणून नोंदणी करावे लागेल. अशी अटकळ बांधली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT