प्रवीण दरेकरांची टीका 
मुंबई

सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री- प्रवीण दरेकरांची टीका

कृष्ण जोशी

मुंबई : राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे आणि जनतेत न जाणारे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख होईल, अशी उपरोधिक टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली.

राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले; पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ नाही. काल-परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे "मातोश्री'च्या बाहेर यायला तयार नाहीत. क्वचित अपवाद म्हणून एखाद्या ठिकाणी गेले असतील; पण सरकारचा प्रमुख म्हणून काम करत असताना अशाप्रकारे घरात बसून राज्य चालवता येत नाही. यामुळे आता जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

मुंबईत कोरोना चाचण्या वाढवा...
 
एवढे महिने राज्य सांभाळूनही राज्यात तर सोडाच, मुख्यमंत्री मंत्रालयातही यायला तयार नाहीत. अन्य सर्व मंत्री व नेते मंत्रालयात असले तरीही मुख्यमंत्री मुंबईत असूनही घरूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेतात. पुण्यात आज कोरोनामुळे पत्रकार रायकर यांचा आज मृत्यू झाला. मग आरोग्य यंत्रणेचे काय झाले? मुख्यमंत्र्यांनी पुण्याला जाऊन मोठमोठ्या घोषणा करून तेथे जम्बो कोव्हिड सेंटर सुरू केले; पण रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पत्रकाराला नाहक जीव गमवावा लागला. राज्यात कधी नव्हे इतका विस्कळीतपणा या सरकारच्या काळात आला आहे, अशी टीकेची झोडही दरेकर यांनी उठवली.

एका बाजूला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असोत, आपण स्वतःही विविध प्रश्‍नांवर राज्यात वणवण फिरत आहोत. ज्येष्ठ नेते शरद पवारही काही ठिकाणी जाऊन आले; मात्र मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही आणि हे राज्याच्या हिताचे नाही, असेही दरेकर यांनी दाखवून दिले.

(संपादन- बापू सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्ज खात्यात जमा होणार दोन लाख रुपये, वाचा...

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासासाठी बेस्ट उकडलेल्या रताळ्याचा हेल्दी कीस! लगेच नोट करा रेसिपी

Samsung Success Story: कधी मासे आणि नूडल्स विकायची! आज अब्जावधी डॉलरचं टेक साम्राज्य; Samsung च्या यशाचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT