Narayan-Rane sakal
मुंबई

राणे यांच्या विरोधात वसई तालुक्यात तीन ठिकाणी तक्रारी

आज सकाळी वसई तालुक्यातील माणिकपूर, नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात शिवसेनेने तक्रारी दाखल केल्या

संदिप पंडित

विरार : केंन्द्रीय मंत्री नारायण राणे ( narayan rane) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या विरोधात बदनामीकारक आणि समजात द्वेष भावना भडकवणारी विधाने केल्या प्रकरणी आज सकाळी वसई तालुक्यातील माणिकपूर, नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात शिवसेनेने तक्रारी दाखल केल्या असून येथील वातावरण तापले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल रायगड येथे बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानकारक, आपत्तीजन्य आणि समाजात तेढ निर्माण करणारे शब्द वापरून राज्याचा अपमान केला आहे. त्यांनी वापरलेले शब्द हे गुन्ह्याच्या स्वरूपाचे असल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारींवर माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर,विधानसभा संघटक विनायक निकम, सौ किरण चेन्दवणकर, उपजिल्हा प्रमुख नवीन दुबे,पंकज देशमुख,राजाराम बाबर ,प्रथमेश राऊत यांच्या सह्या असून वसई तालुक्यातील शिवसेना याबाबत एकत्र आल्याचे चित्र याठिकाणी दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: रिक्षा चालकांनी मदत नाकारली, आईच्या खांद्यावर लेकराने जीव सोडला; भाजपचा पदाधिकारी धावला, पण..

Solapur AkashKandil: कागदी आणि प्लास्टिक कंदील विसरा! सोलापुरात मिळतोय खास मातीचा आकाश कंदील, जाणून घ्या किंमत किती?

OMG! फक्त ५ लाखांची लोकसंख्या असलेला देश खेळणार FIFA फुटबॉल वर्ल्ड कप

Passenger bus caught fire : भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस पेटली; लहान मुलं, महिलांसह १५ जणांचा मृत्यू

Thane News: परप्रांतीयांची मुजोरी वाढली! दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून वाद पेटला, अमराठी महिलांचं मराठी महिलांसोबत नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT