congress leader sanjay nirupam statement against party press conference Sakal
मुंबई

Sanjay Nirupam Mumbai : शिंदे गटातल्या खासदाराविरोधात रॅली आधीच निरुपम पोलिसांच्या ताब्यात

शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात निरुपम रॅली काढणार होते.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज ते बाईक रॅली काढणार होते. पण त्या बाईक रॅलीच्या आधीच निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निरुपम यांना त्यांच्या घरातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संजय निरुपम यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये निरुपम म्हणतात, "आमचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघातील त्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव आणण्यासाठी मी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. आमचा शांततापूर्ण राजकीय कार्यक्रम पार पाडण्यास परवानगी देण्याऐवजी पोलिसांनी कोणताही आदेश न दाखवता मला जबरदस्तीने ताब्यात घेतले".

गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदारकीच्या राजीनामा मागण्यासाठी निरुपम आज बाईक रॅली काढणार होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना लोखंडवाला शास्त्रीनगर येथील घरातून ताब्यात घेतलं आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश मतदारांचा अपमान असल्याने त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी माजी खासदार व काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 2 वाजता बाईक रॅली काढण्यात येणार होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि रॅली काढण्यापासून रोखलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT