मुंबई

राजीव सातव, तू हे काय केलेस...; संजय राऊतांची भावनिक पोस्ट

विराज भागवत

मुंबई: काँग्रेस खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचं रविवारी निधन झालं. पुण्यातील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना इतर आजारांनी ग्रासलं होतं. शनिवारी त्यांना न्युमोनियाची लागण झाली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Jehangir hospital) राजीव सातव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. सातव यांना राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सातव यांच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट केली. (Congress MP Rajiv Satav passes away Sanjay Raut Sharad Pawar Devendra Fadnavis Political fraternity mourns his death)

"राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या.. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे.. चार दिवसांपूर्वीच व्हिडिओ काॅलवर आपण निशब्द 'हाय हॅलो' केले.. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे.. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?", अशा भावना त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या.

दरम्यान, राजीव सातव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे गुजरात प्रभारी होते. ते काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मध्ये हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'मी असं बोललेलो नाही'; शरद पवारांचे प्रादेशिक पक्षांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : राज्यात मविआला 30 ते 35 जागा मिळतील, शरद पवारांनी वर्तवला अंदाज

Healthy Diet: पौष्टिक पदार्थांचा अभाव हे अनेक आजारांचं कारण; ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं कशी असावी रोजची थाळी?

Mumbai Indians : मुंबईसाठी कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात हार्दिक पांड्या अपयशी! नावावर केला लज्जास्पद विक्रम

Kolhapur Lok Sabha : वाढला मतदानाचा टक्का, कोणाला बसणार धक्का; 'या' मतदारसंघातील मतदान ठरणार निर्णायक

SCROLL FOR NEXT