मुंबई

आदर्श समारंभ: हळदीकुंकू कार्यक्रमात गंगा भागिरथींचा वाण देऊन सन्मान!

Ulhasngar News: महिला भावूक, काँग्रेसचा आगळावेगळा कार्यक्रम

दिनेश गोगी - सकाळ वार्ताहर

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उल्हासनगरात आगळ्यावेगळ्या हळदीकुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात विधवा महिलांना आमंत्रित त्यांनाही वाण देऊन त्यांचा सन्मान केला.यावेळी महिला भावूक झाल्या होत्या.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आणि माजी गटनेत्या अंजली साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली काॅग्रेसच्या महिला अध्यक्षा मनीषा महाकाळे व निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग अध्यक्षा प्राध्यापक सिंधू रामटेके यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक हाॅल लालचक्की येथे महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

.कार्यक्रमाच्या सुरवातीला राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सह सर्व महानायीकांचे स्मरण करुन महिलांचे वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करण्यात आले.तसेच संविधानाचे वाचन करून शपथ देण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे या हळदीकुंकू समारंभास विवाहित महिलांसोबत विधवा महिलांनाही आमंत्रित करण्यात आले होते व त्यांनाही वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगाने महिला अत्यंत भावूक झाल्या होत्या.सर्व महिलांनी झिम्मा व फुगडी खेळून आपला आनंद द्विगुणीत केला.

यावेळी यावेळी कॉग्रेसच्या महिला अध्यक्षा मनीषा महाकाळे,निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग अध्यक्षा प्राध्यापक सिंधू रामटेके,माजी गटनेत्या अंजली साळवे,माजी मुख्याध्यापीका विजया मोरे,इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा टिना ठाकुर,

विशाल सोनावणे,संतोष मिंडे,दीपक सोनावणे,राकेश मिश्रा,अनिल यादव,अन्सार शेख,मंगेश हिवराळे,पुषोत्तम महाडिक जेष्ठ पदाधिकारी कमल वेलकुंडे,सचिव मालती गवई,कालिंदी गवई,विजया गाडे,सुधा जोगळेकर,मानसी पाटकर,मदीना शेख,मनीषा नगारे,कुसुम महाकाळे,संध्या महाकाळे,आशा कोलगे,मेघा कोलगे,दिपा महाकाळे,काजल महाकाळे यांच्यासोबत 950 महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT