Congress President election Voting at Tilak Bhavan
Congress President election Voting at Tilak Bhavan sakal
मुंबई

काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठी सोमवारी टिळक भवन येथे मतदान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे. या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी सोमवारी मतदार होणार आहे. यासाठीची सर्व तयारी झाली आहे. देशभरातील सर्व राज्यांमध्ये हे मतदान होणार असून महाराष्ट्रातही मतदानाची पूर्ण तयारी झालेली आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मतदानाचे केंद्र असून तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील 561 प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात.

या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री श्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आ. कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत. आज त्यांनी टिळक भवन येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. जे प्रदेश प्रदेश प्रतिनिधी मतदार आहेत, त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बारकोड असलेले ओळखपत्र दिलेले आहे. ते ओळखपत्र आणि दुसरे कुठलाही फोटो पुरावा ओळखपत्र जसे की मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक यापैकी एक अशी दोन्ही ओळखपत्रे दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.

या निवडणुकीत श्री मल्लिकार्जुन खर्गे व श्री शशी थरूर असे दोन उमेदवार आहेत. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 50 हजार शासकीय पदांची मेगाभरती अन्‌ मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय लवकरच; 20 लाख मुलींना मिळणार 642 कोर्सेसचे मोफत उच्चशिक्षण

Lok Sabha Result Maharashtra: काँग्रेसचा सिक्सर अन् भाजप हिट विकेट; वाचा, लोकसभा निवडणुकीत कशी होती महाराष्ट्रातील पक्षांची कामगिरी

T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक पावलाची सुरुवात जागतिक कसोटी;एकदिवसीय विश्‍वकरंडकानंतर आता टी-२० वर्ल्डकपच्या जेतेपदाचे ध्येय

Yoga For headache : सततच्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग, दररोज करा ‘ही’ योगासने, लवकर मिळेल आराम

West Bengal Violence: निवडणुका संपताच बंगालमध्ये उसळला हिंसाचार; TMC नेत्याच्या घरावर फेकला बॉम्ब, भाजप कार्यालयाची तोडफोड

SCROLL FOR NEXT