Congress
Congress 
मुंबई

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधीच हवेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी सोडू नये, या मागणीसाठी देशभरातील काँग्रेस पदाधिकारी राजीनामे देत असतानाच राज्य महिला काँग्रेसनेही तसाच आज ठराव केला. टिळक भवन काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे आणि राज्यात पुन्हा एकदा महिलांना न्याय देणारे काँग्रेसचे सरकार स्थापन करावे, असे आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी केले आहे.

या बैठकीसाठी राज्यातून महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या बैठकीला ॲड. चारुलता टोकस, सचिन सावंत, ममता भूपेश यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकीला सामोरे जात असताना महिलांनी सशक्त उमेदवार म्हणून स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असे सचिन सावंत म्हणाले. तसेच, परंपरागत पद्धतीने उमेदवारी न देता भविष्यात थेट जनतेशी संपर्क असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जावी आणि महिलांनी गांभीर्याने तळागाळापर्यंत संपर्क वाढवावा, असे ममता भूपेश म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; पोलीस ॲक्शन मोडवर

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

उतावळा नवरा! लग्नाच्या दोन महिने आधीच मुलीच्या घरी गेला अन् गोंधळ घातला, पोलिसांनी थेट...

Entertainment News: "मी मेकअप रुममध्ये कपडे बदलत असताना..."; अभिनेत्रीनं सांगितला मालिकेत काम करताना आलेला धक्कादायक अनुभव

अयोध्येत बसमधून ९५ बालकांची CWC ने केली सुटका, सर्व मुलं ५ ते ९ वयोगटातील

SCROLL FOR NEXT