file photo 
मुंबई

हिंदूत्वाचा अजेंडा राबवण्याचे कारस्थान 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रीय नागरिकत्व कायदा म्हणजे दुसरेतिसरे काहीच नसून त्याच्याआडून हिंदूत्वाचा अजेंडा राबवण्याचे कारस्थान आहे. 'हिंदू राष्ट्र'ची स्थापना करणे हा यामागचा अंतस्थ हेतू असून मानव अधिकार नाकारणाऱ्या, भेद निर्माण करणाऱ्या या आणि ध्रुवीकरण करणाऱ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे असे आवाहन केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी केले.

हे ही वाचा....महाराष्ट्राची ऐतिहासिक उपेक्षा 
मुंबई कलेक्‍टिव्ह या दोन दिवसीय परिषदेमधील 'सांप्रदायिकतेच्या विरोधातील संघर्ष' या विषयावर विजयन बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संपादक एन. राम उपस्थित होते. माधव गोळवलकरांच्या 'हिंदू राष्ट्र' स्थापन करण्याच्या दिशेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यापूर्वी केलेल्या कारवाया आणि आताही आरएसएस त्याच दिशेने चालला आहे. गोळवलकरांच्या 'हिंदू राष्ट्र' संकल्पनेनुसार इतर धर्मियांना नागरिकत्वाचा अधिकारच नाकारण्यात आलेला असून सीएए कायद्याचा पाया याच गृहितकावर आधारलेला असल्याने त्याला विरोध करण्यासाठी राज्य सरकार म्हणून आम्ही भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सीएएला विरोध करावा यामागे तीन प्रमुख कारणांचा उहापोह विजयन यांनी केला. ते म्हणाले, संविधानाच्या एकात्मतेला ठेच पोहोचवणारे, मानवी हक्क नाकारणारा, भेद निर्माण करणारा आणि हिंदूत्वाचे राजकारण आणि तत्वज्ञान लादण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो या देशाच्या सभ्यतेलाच आव्हान देणारा आहे. या देशात शास्त्रीय आणि तर्कसंगत विचाराची परंपरा आहे ज्यावर ठरवून हल्ला केला जात आहे. 

बेरोजगारीचा उच्चांक 
देशाचा विकास दर कोसळत असल्याबाबतही विजयन यांनी चिंता व्यक्त केली. बेरोजगारीने 45 वर्षातला उच्चांक गाठला आहे. लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे याविषयी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही चिंता व्यक्त केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT