cooper hospital nurse strike sakal media
मुंबई

कूपर रुग्णालयात परिचारीकांचा अभाव; आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे

भाग्यश्री भुवड

मुंबई : आयसीयूतील 10 रुग्णामागे  1 परिचारिका, जनरल वॉर्ड मध्ये 6 रुग्णामागे एक परिचारीका यामुळे परिचारीकांवर (Nurse) कामाचा ताण येत असून अन्य उपस्थित परिचारिकांवर कामाचा ताण येतो. परिचारीकांची रिक्त पदे भरण्याबाबत कूपर रुग्णालयातील (cooper hospital) नोबेल नर्सिंग युनियनच्या माध्यमातून मंगळवारी मुंबईतील कूपर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन (Nurse strike) करण्यात आले. दरम्यान, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते (dr shailesh mohite) यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (Kooper hospital nurse strike about shortage of nurse employee in hospital)

कूपर रुग्णालयात 183 नर्सिंग स्टाफ आहे. एका परिचारीकेस दोन विंग मध्ये काम करण्याचा दबाव टाकण्यात येतो. त्यामुळे परिचाकांना योग्य रितीने कामाची जबाबदारी पार पडणे शक्य होत नसून यासाठी रिक्त पदे भरण्यात यावी, कोरोना काळातील विलगीकरण रजा मंजूर करावी, दीर्घ काळापासून गैरहजर असणाऱ्या परिचारीकांवर कारवाई करण्यात यावी, रिक्त पदे भरली जात नाही तोपर्यंत नव्याने सुरु केलेले विभाग सध्या बंद ठेवावे.

रिक्त असलेली अधिसेविकाची जागा भरावी, शिकाऊ डॉक्टर कुठल्याही सूचनेचे पालन करत नाही याची रुग्णालय प्रशासनाने दखल घ्यावी अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शैलेश मोहिते यांना पत्र दिले होते. मात्र मागण्यापूर्ण करण्याबाबत रुग्णालय प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याने मंगळवारी रुग्णालय आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे नोबेल नर्सिंग युनियनच्या प्रतिनिधींनी सांगितले.

दरम्यान, जागा रिक्त असून त्या भरण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. रिक्त जागा भरण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असून परिचारीकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी परिचारीकांच्या सहकार्याने समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शैलेश मोहिते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT