मुंबई : कोविड जिनोम सिक्वेसिंगच्या (corona genome sequencing) दुसऱ्या टप्प्यातील 376 नमुन्यांपैकी एकही ‘डेल्टा प्लस’ (Delta plus infection) आढळलेला नाही. पहिल्या टप्प्यात देखील 188 नमुन्यांपैकी एकही नमुना ‘डेल्टा प्लस’ बाधित आढळला नव्हता. कोविड - 19’ विषाणूच्या जनुकीय सुत्राचे निर्धारण (Next generation genome sequencing) करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कस्तुरबा रुग्णालयात यापूर्वीच कार्यान्वित झाली आहे. यानुसार चाचण्यांचे विश्लेषण आधारित दुस-या टप्प्यातील निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार 376 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, यापैकी 304 नमुने हे ‘डेल्टा’ (Delta) उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर इतर नमुन्यांमध्ये ‘नाईन्टीन-ए’ (19A) उप प्रकारातील २ आणि ‘ट्वेन्टी-ए’ (20A) उप प्रकारातील 4 नमुने आणि उर्वरित 66 नमुने हे सर्वसाधारण कोविड विषाणूचे आहेत. विशेष म्हणजे पहिल्या व दुस-या अशा दोन्ही टप्प्यातील नमुन्यांमध्ये अतिवेगाने लागण होणा-या ‘डेल्टा प्लस’ या उपप्रकारातील एकही नमुना आढळून आलेला नाही, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
दरम्यान, ‘डेल्टा’ या उप प्रकारातील कोविड विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - 19’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, 2 किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.