obesity
obesity sakal media
मुंबई

लहान मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा; बदलत्या जीवनशैलीचा परिणाम

सकाळ वृ्त्तसेवा

ठाणे : मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे (corona pandemic) बहुतांश लोकांचा दिनक्रम बदलला आहे. त्यात शाळा बंद, मैदानी खेळांवर आलेले निर्बंध, ऑनलाईन शिक्षण, अशा बैठ्या जीवनशैलीमुळे (Lifestyle changes) लहान मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल (Mentally changes) झालेले आहेत. मुलांचा बदललेला आहार आणि दिनक्रम (Food and daily routine) यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम (Impact on health) होत असल्याचे पाहावयास मिळत असून लहानग्यांमध्ये आलेल्या शिथिलतेमुळे, त्यांच्या वजनात प्रमाणापेक्षा जास्त वाढ अथवा लठ्ठपणाची समस्या (obesity Problem) वाढू लागली आहे.

कोरोना महामारीच्या संकटकाळात जवळपास दोन वर्ष शाळा बंद असून विद्यार्थ्यांचे डिजिटल माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचेही प्रमाण अत्यल्प झाले असून, सध्या बहुतांश मुले ही मोबाईल फोन, डिजिटल गॅजेट्सच्या आहारी गेली आहेत. मोबाईलवर गेम खेळताना तासनतास एका जागेवर बसून राहणे, घरात असल्याने प्रमाणापेक्षा जास्त खाणे, जंगफूडचे सेवन करणे इत्यादी कारणे लहान मुलांच्या वजनवाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत.

कोरोना महामारी काळात ठाणे शहरातील बालरोग तज्ज्ञांकडे उपचारांसाठी येणाऱ्यापैकी २५ टक्के बालकांच्या वजनात प्रमाणापेक्षा जास्त वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. यात अधिक तर ४ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश आहे. बालकांच्या वाढणाऱ्या वजनाकडे दुर्लक्ष केल्यास लठ्ठपणाची गंभीर समस्या उद्भवून त्यास लहान वयात मधुमेह, एकाग्रतेचा अभाव असे आजार बळावू शकतात, असे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने घराबाहेर पडण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध आता काही प्रमाणात शिथिल झाले आहेत. तेव्हा दोन वर्ष घरात असल्यामुळे वजनात वाढ झालेल्या लहान मुलांना, पालकांनी मैदानी खेळात रमवावे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच शाळेतील अभ्यासासोबतच लहान मुलांना धावणे, सायकल चालवणे, जिम्नॅस्टिक, फुटबॉल अशी शारीरिक हालचाल होणारे खेळ खेळण्यास प्रोत्साहन देऊन त्यांना संतुलित आहार द्यावा, असे सांगण्यात आले आहे.

"कोरोना काळात घरी राहिल्याने शरीराची अधिक हालचाल होत नसल्याने अनेक लहान मुलांच्या वजनात प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाल्याचे आढळते; परंतु आता निर्बंध शिथिल होत असताना संपूर्ण खबरदारी घेत पालकांनी आपल्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. व्हिडीओ गेम्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेटसोबत एकाच ठिकाणी खेळण्यापेक्षा, शारीरिक हालचाल होणारे खेळ खेळल्यास मुलांचे लठ्ठपणाकडे झुकणारे वाढते वजन नियंत्रित येण्यास मदत होईल."

- डॉ. आनंद बेडेकर, बालरोगतज्ज्ञ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT