संग्रहित
संग्रहित  
मुंबई

नवी मुंबईत मल्टिस्पेशालिटी रुग्णालये रडारवर! 

सुजित गायकवाड

नवी मुंबई : कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला असताना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व यंत्रणा एकवटल्या आहेत. मात्र नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास काही खाजगी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांनी नकार दिला आहे.

नेरूळ सेक्‍टर 27 मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयाने सपशेल नकार दिला. त्यामुळे या कुटुंबाला अखेर मुंबईतील रहेजा रुग्णालय गाठावे लागले आहे. दरम्यान, नवी मुंबई पालिकेने रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

मुंबईतील एका नामांकित विकासकाकडे अभियंता असलेल्या नेरूळच्या तरुणाला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यामुळे या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

त्या तरुणामुळे त्याची आई, 7 वर्षांचा लहान मुलगा आणि काही दिवसांपूर्वी वडिलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला जेव्हा तरुणाला लागण झाली तेव्हा स्वतःच्या आरोग्य विम्यामुळे त्यांनी सरकारी रुग्णालयापेक्षा खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी धाव घेतली.

नेरूळ आणि वाशीतील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांनी त्यावेळी त्या कुटुंबीयांना उपचार करण्यासाठी नकार दिला. त्यामुळे अखेर या रुग्णांना मुंबईतील रहेजा रुग्णालयात जावे लागले. सध्या त्यांच्या कुटुंबातील चारही सदस्य कोरोनाबाधित असून सर्वांवर रहेजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाबाधितांना तात्काळ उपचार मिळावेत, याकरीता सरकारने राज्यभरात 300 पेक्षा जास्त रुग्णालये कोव्हीड- 19 रुग्णालये परावर्तीत केली आहेत. नवी मुंबईत महापालिकेचे वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय कोव्हीड- 19 रुग्णालय करण्यात आले आहे. 

शहरातील मोजक्‍या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांना महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची लेखी परवानगी दिली आहे. मात्र त्यानंतरही कोणी रुग्णांना नकार देत असेल तर अशा रुग्णालयांवर कारवाई करावी लागेल. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका. 

नेरूळमधील त्या कोरोनाबाधित कुटुंबाला सरकारी रुग्णालयातील उपचारांबाबत शाश्‍वती नसल्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायचे होते; परंतु त्यांना खाजगी रुग्णालयांनी उपचारांना नकार दिल्यामुळे अखेर मुंबईत जावे लागले. अशा रुग्णालयांवर महापालिकेने कारवाई करायला हवी. 
- मंगल घरत, महिला महामंत्री, भाजप नवी मुंबई. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT