Mumbai Local Train sakal media
मुंबई

लोकल प्रवासात सुमारे 2 लाख लसवंतांची पडणार भर ?

कुलदीप घायवट

मुंबई : स्वातंत्र्यदिनापासून कोरोना लसीचे दोन डोस (corona two dose0 घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास (Mumbai train) खुला झाला. दोन डोस धारकांनी मासिक पास घेण्यासाठी (monthly pass) मागील सहा दिवसात प्रमाणपत्राची (vaccination certificate) पडताळणी घेतली. मात्र, 15, 16 ऑगस्ट रोजी सुट्टी असल्याने लोकल, रेल्वे परिसरात प्रवाशांची किरकोळ वर्दळ दिसून आली. तर, खऱ्या अर्थाने 17 ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्या नोकरदार वर्गाचा लोकल प्रवास सुरू होणार आहे. यासह सुमारे 2 लाख लसवंताची (2 lac vaccinated people) लोकल प्रवासात भर पडण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने सुचना जाहिर केल्यानंतर लगेच रेल्वे स्थानकांत नागरिकांच्या कोरोना प्रमाणपत्राची आणि ओळखपत्राची पडताळणी करण्याच्या कामाला वेग आला. त्यामुळे मध्य रेल्वेवरून 11 ऑगस्टपासून ते 16 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 1 लाख 10 हजार नागरिकांनी मासिक पास काढले. यामध्ये डोंबिवलीवरून सर्वाधिक 9 हजार 631 मासिक पास काढण्यात आले. तर, पश्चिम रेल्वेवर याच कालावधीमध्ये 52 हजार 703 नागरिकांनी पास काढले. यामध्ये 5 हजारांहून अधिक नागरिकांनी बोरीवली येथून सर्वाधिक मासिक पास काढले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 पर्यंत साधारण 1 लाख 62 हजार प्रवाशांना मासिक पास मिळाले.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकल पूर्ण क्षमतेने चालविण्यास सोमवारी, (ता.16) रोजीपासूनच सुरूवात केली. मध्य रेल्वेवर कोरोना पूर्वी एकूण 1 हजार 774 लोकल फेऱ्या धावत होत्या. तर, 14 ऑगस्टपर्यंत 1 हजार 612 फेऱ्या धावत होत्या. मात्र, सोमवारपासून 74 फेऱ्या वाढवून 1 हजार 686 फेऱ्या धावण्यास सुरूवात झाली. एकूण फेऱ्यांच्या तुलनेत मध्य रेल्वेवर सध्या 95 टक्के लोकल फेऱ्या धावत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. पश्चिम रेल्वेवर कोरोना पूर्वी 1 हजार 367 लोकल फेऱ्या होत होत्या. तर, 14 ऑगस्टपर्यंत एकूण 1 हजार 201 फेऱ्या धावत होत्या. मात्र, सोमवारपासून 99 फेऱ्या वाढवून 1 हजार 300 फेऱ्या धावण्यास सुरूवात झाली, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

सोमवारी, (ता.16) रोजी पतेती असल्याने अनेक कार्यालयांना सुट्टी होती. परिणामी, लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह, लसवंतांची संख्या कमी होती. महत्त्वाच्या आणि गर्दीचे स्थानक म्हणून ओळख असलेल्या कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा, सीएसएमटी, चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर, वसई रोड, विरार, वडाळा रोड, वाशी, बेलापूर, पनवेल या स्थानकावर पीक अव्हरवेळी गर्दी दिसून आली. त्यानंतर स्थानकावर तुरळक गर्दी दिसून आली. यासह इतर स्थानकावर प्रवाशांच्या रहदारीचे प्रमाण कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT