corona vaccination sakal media
मुंबई

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोरोना लसीकरणात विक्रमी कामगिरी

दिवसभरात 9 लाख 36 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (corona vaccination) मोहिमेत महाराष्ट्राने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला (independence day) अजून एक विक्रम (record) नोंदविला. दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत 9 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण (lots of people vaccination) करण्यात आले. एका दिवसात एव्हढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे शस्त्र असून लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. दिवसाला किमान 10 लाख लसीकरणाची क्षमता राज्याची असून आज झालेल्या विक्रमी लसीकरणाने हे सिद्ध झाले आहे. यापुढेही असेच विक्रमी संख्येने लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असेल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

आज सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरात 9 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी 3 जुलै रोजी 8 लाख 11 हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती त्यात आजच्या लसीकरणाच्या सर्वोच्च संख्येने अजून एक नवा विक्रम केल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave Alert : जानेवारीतही थंडीची लाट राहणार; पुढच्या तीन महिन्यांचा हवामान अंदाज आला समोर

Latest Marathi News Live Update : बंडखोरी करणाऱ्यांना शांत करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी घेतला पुढाकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले सक्रिय

बॉलिवूडच्या खलनायकानं साकारलेली नायकाची भूमिका, 15 मिनिटात सिनेमा थिएटरमधून बाद, कोणता आहे 'तो' सिनेमा?

माेठी बातमी! राज्यातील दूध उत्पादक संकटात; खरेदी दरात सहा महिन्यांपासून वाढच नाही, पशुखाद्याचे दर वाढले

Vishwas Patil: ‘संभाजी’ पुस्तकातील चूक सुधारण्याची तयारी: संमेलनाध्यक्ष विश्वास पाटलांची स्पष्टोक्ती, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT