मुंबई: मास्क न वापरणारे आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार पोलिसांना देताना दंडातील निम्मी रक्कम पोलिस कल्याण निधीला देण्याचा महानगर पालिकेचा विचार आहे. शुक्रवारी महानगर पालिकेने १३ हजार ५९२ जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून २७ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोविड रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर महानगर पालिकेने मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लिन अप मार्शलची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर मुंबई पोलिसांनाही २०० रुपये दंड वसूल करण्याचा अधिकार आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. क्लिन मार्शलकडून वसूल केलेल्या दंडाचा निम्मा हिस्सा महानगर पालिकेला मिळतो तर निम्मा हिस्सा संबंधीत संस्थेला मिळतो.त्याच धर्तीवर पोलिसांनी वसूल केलेल्या दंडाची अर्धी रक्कम पोलिस कल्याण निधीला देण्याची सूचना पालिका आयुक्तांनी केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
महानगर पालिकेने आता पर्यंत मास्क न वापरणाऱ्यांकडून ३१ कोटी ५२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. १५ लाख ५८ हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी आयुक्तांनी बैठक घेऊन मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी संपूर्ण मुंबईतून १३ हजार ५९२ जणांवर कारवाई झाली असून २७ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अंधेरी, कुर्ला परिसरातून सर्वाधिक कारवाई
अंधेरी जोगेश्वरी पूर्व के पूर्व प्रभागात शुक्रवारी ९१८ जणांकडून दंड १ लाख ८३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. के पश्चिम अंधेरी जोगेश्वरी पश्चिम परिसरातून १२५३ जणांवर कारवाई करुन २ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कुर्ला एल प्रभागाच्या हद्दीतून ९०२ जणांवर कारवाई करुन १ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
देवनार गोवंडीत फक्त १४३ जणांवर कारवाई
देवनार, गोवंडी एम पूर्व प्रभागात १४३ जणांवर कारवाई करण्यात आली असून २८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. संपूर्ण मुंबईतील ही सर्वात कमी कारवाई आहे. त्या खालोखाल बी प्रभाग डोंगरी, मश्जिद बंदर याभागातून १६० जणांवर कारवाई करुन ३२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याच बरोबर नानाचौक, ताडदेव मलबारहिल या डी प्रभागातून २८२ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्या खालोखाल माझगाव भायखळा या भागातून ३१३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
--------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
corona virus Friday bmc took action against 13 thousand people collected fines 27 lakh
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.