मुंबई

कोविड -19 मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये 'फंगल इन्फेक्शन' संसर्गाची वाढ

भाग्यश्री भुवड

मुंबई:  कोविड -19 पासून बरे झालेल्यांमध्ये बुरशीजन्य संसर्ग वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोविड 19 मधून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांपैकी रुग्णांमध्ये काळ्या बुरशीजन्य संसर्गाची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईतील पालिका आणि खासगी रुग्णालयात म्यूकोर्मिकोसिसचे रुग्ण वाढले. ज्यामुळे अंधत्व, अवयवांचे बिघडलेले कार्य, शरीरातील ऊतींचे नुकसान आणि अखेरीस मृत्यूही होऊ शकतो. वेळेवर उपचार न केल्यामुळे असे होते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरभर अशा घटनांमध्ये हळूहळू वाढ होत आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा दुर्मिळ असा जंतू संसर्ग झालेल्या एका महिलेचे प्राण वाचवण्यात परळच्या ग्लोबल रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. या फंगल इन्फेक्शनमुळे हाडांची झीज आणि स्नायू कमकुवत होणे असे काही दुष्परिणाम दिसून आले आहेत. डोळ्यांवरही घातक परिमाण होऊ शकतो. 

काय आहे म्यूकोर्मिकोसिस? 

म्यूकोर्मिकोसिस म्हणजे एक प्रकारे फंगल इन्फेक्शन असून कोरोनातून ठीक झालेल्या रूग्णांमध्ये हा आजार होतो. म्युकॉरर्मायकोसिसचा संसर्ग हा अतिशय जीवघेणा आहे. या रूग्णांची संख्या सध्या वाढताना दिसून येत आहे. विविध फंगल इन्फेक्शनवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी परळच्या ग्लोबल रूग्णालयात ‘म्युकॉरर्मायकोसिस’ क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. ‘फंगल इन्फेक्शन’ वर उपचार करणारे मुंबईतील हे पहिले क्लिनिक ठरले आहे. 

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात राहणाऱ्या शैला सोनार यांना कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने आणि रक्तातील साखरेच्या कमतरतेमुळे ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा दुर्मिळ आजार झाला होता. या महिलेच्या नाकात आणि डोक्यापर्यंत हा संसर्ग पोहोचला होता. स्थानिक रूग्णालयात या महिलेवर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्रास वाढू लागल्याने कुटुंबियांनी तिला डिसेंबर 2020 रोजी मुंबईतील ग्लोबल रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी महिलेवर अँटी-फंगल थेरपी सुरू करण्यात करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे संसर्ग झालेल्या डोक्यावरील टाळूचा अर्धा भाग काढून टाकण्यात आला. वेळीच उपचार झाल्याने या महिलेचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. 

परळच्या ग्लोबल रूग्णालयातील कान-नाक-घसा सर्जन डॉ. मिलिंद नवलखे यांनी सांगितले की,“म्यूकोर्मिकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. मधुमेह रूग्ण आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रूग्णांना याचा धोका अधिक असतो. 90 च्या दशकात बुरशीजन्य संसर्गाने पीडित एक ते दोन रूग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या 25 वर्षात दरवर्षी 25-30 नवे रूग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र, कोरोनातून बरे झालेले 50 हून अधिक रूग्ण मागील तीन महिन्यात रोगप्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे बुरशीजन्य आजाराचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी आले होते." 

काय आहेत लक्षणे ? 

या आजारात रूग्णाला सर्दी होते. नाकाला सूज येऊन वेदना जाणवू लागतात. वेळीच उपचार न झाल्यास डोळ्यावर परिणाम होऊन दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. या आजाराला नाकाची पोकळी आणि नाकासंबंधी सायनसपासून सुरूवात होते. त्यानंतर डोळ्यांवर आणि मेंदूवर याचा परिणाम होतो. अशा स्थितीत संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी शरीरातील ज्या भागात संसर्ग झाला आहे तो भाग काढून टाकावा लागतो. 

मधुमेह हवा नियंत्रणात

संसर्गजन्य विभागाचे प्रमुख डॉ. वसंत नागवेकर म्हणाले की,“मधुमेहावर नियंत्रण ठेवल्यास कुठल्याही संसर्गाचा धोका टाळता येऊ शकतो. पण संसर्गामुळे होणारी हानी रोखण्याकरता सावध रहा आणि त्वरित उपचार घ्या. संसर्गजन्य आजारावर उपचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘म्युकॉरर्मायकोसिस’ क्लिनिक रूग्णांसाठी वरदान ठरणार आहे." 

रूग्ण शैला सोनार म्हणाल्या की, “कोरोनातून बरे झाल्यानंतर मला डोकेदुखी आणि डोळ्यात वेदना जाणवत होती. पण मी या दुखण्याकडे लक्ष दिले नाही. हळूहळू माझ्या आवाजात आणि श्वासामध्ये बदल होऊ लागला. त्रास वाढू लागल्याने ग्लोबल रूग्णालयात दाखल झाले. याठिकाणी डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्याने आता माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे कोविडमधून बाहेर पडल्यानंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित आरोग्य तपासणी करा." 

केईएममध्ये 50 टक्के रुग्ण

पालिकेच्या केईएम रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडीत आतापर्यंत 15  रुग्ण आले आहेत. ज्यांना म्युकर मायकोसिसची लक्षणे आढळून आली आहे. दरम्यान, यातील सर्वच रुग्णांना डायबिटीज आणि इतर सहव्याधी आहेत. सध्या या सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 15 ते 16 पैकी 7 रुग्ण हे पोस्ट कोविडचे आहेत. तर, हे सर्व प्रौढ आहेत. हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत आहे असे केईएम रुग्णालयातील कान-नाक-घसा या विभागाच्या प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. हेतल मारफातिया यांनी सांगितले. 

दरम्यान,  नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांनी 30 वर्षीय रुग्णावर याच आजारासाठी उपचार केले आहेत.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid 19 cured patients Increased fungal infections

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT