culprit arrested
culprit arrested sakal media
मुंबई

पनवेल : दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त; पाच जणांविरोधात गुन्हा, दोघे गजाआड

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : कामोठे येथील नौपाडा गावामध्ये (Naupada village) एका बंद खोलीवर गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने छापा मारून त्याठिकाणी साठवून ठेवण्यात आलेला सुमारे दीड लाख रुपयांचा गुटखा (gutka seized) व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक केली असून इतर तीन व्यक्तींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नौपाडा गावातील एका घरामध्ये पान मसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवण्यात आला असून दोन व्यक्ती स्कुटीवरून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने छापा टाकला असता गुटखा आढळून आला.

पोलिसांनी सदर घरामध्ये असलेल्या रमेश चौहान (वय २७) व धर्ममेश चौहान (२५) यांच्याकडे चौकशी केली असता, सदरचा माल विनोद भगत व लक्ष्मीनारायण शेठ यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. मालकाने सांगितल्यानुसार ते दोघे व मोठा भाऊ दिनेश चौहान स्कुटीवरून सदर गुटख्याची विक्री करत असल्याचे सांगितले. रमेश, धर्ममेश यांना अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT