murder esakal
मुंबई

Crime: बहिणीसोबत झालेल्या झटापटीत दारुड्या भावाचा मृत्यू  

सकाळ डिजिटल टीम

Crime: आई-वडील, तसेच तीन बहिणींना सतत मारहाण करणाऱ्या व्यसनी भावाचा बहिणींसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाल्याची घटना ऐरोलीत उघडकीस आली आहे. शैलेश रामचंद्र सोरटे (३४) असे या मृत भावाचे नाव असून त्याच्या मृत्यूनंतर तो दारू पिऊन नशेत कुठेतरी पडून जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी खोटी माहिती शैलेशच्या बहिणींनी पोलिसांना दिली होती.

पोलिसांनी केलेल्या तपासात बहिणींसोबत झालेल्या झटापटीत शैलेश जखमी झाल्यामुळे त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत शैलेशची मोठी बहीण ज्योती सोरटे (३६) हिच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.


मृत शैलेश सोरटे हा ऐरोली सेक्टर-१७ मधील अस्मिता सोसायटीमध्ये आई कुसुम सोरटे (७०), बहीण नीता सोरटे (३७), ज्योती सोरटे (३६) व शिल्पा सोरटे (३२) यांच्यासह राहण्यास होता.

शैलेश काहीही काम-धंदा करत नव्हता. तसेच त्याला दारू पिण्याचे व्यसन लागल्याने दररोज दारू पिऊन आल्यानंतर तो आई-वडिलांना, तसेच तिन्ही बहिणींना अमानुषपणे मारहाण करत होता.

११ नोव्हेंबरला मध्यरात्री दीड वाजता त्याने पुन्हा आईला व बहिणींना मारहाण केली. त्यामुळे आपल्या बहिणींना व आईला सोडवण्यासाठी ज्योतीने पकडीने शैलेशच्या डोक्यात मारले. त्यानंतर तो खाली पडल्यानंतर तिघी बहिणी पहाटे ४ च्या सुमारास बेडरूममध्ये गेल्या.

शैलेश निपचीत पडल्याने तिन्ही बहिणींनी सकाळी ६ च्या सुमारास त्याला प्रथम ऐरोली येथील खाजगी रुग्णालयात, त्यानंतर त्याला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी खोटी माहिती पोलिसांना दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: जिथं विषय गंभीर, तिथं RO-KO खंबीर! रोहित-विराटपुढे 'कांगारुं'नी गुडघे टेकले, अन् भारतानं व्हाईटवॉश टाळला

Gopal Badne: साताऱ्यातून पळाला अन् 'इथे' जाऊन लपला... पीएसआय गोपाल बदने कुठे आहे? शेवटचं लोकेशन आलं समोर

Army Public School Recruitment 2025: 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी! आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची अंतिम तारीख

Relationship Tips: जर तुम्हाला नातं मजबूत बनवायचं असेल तर 'या' 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Pune Rain: जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांची धांदल; भोर, मुळशी, जुन्नर तालुक्यांतील भात पिकावर संकट

SCROLL FOR NEXT