Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime : 2 चिमुरड्यांवर नोकराकडून अनैसर्गिक अत्याचार; मुलांना त्रास झाल्याने घटना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 5 वर्षे आणि 4 वर्षांच्या 2 मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली. आरोपी नोकर असून मालक घरी नसताना त्याने मुलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

त्याने प्रथम चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर दोन्ही मुलांवर अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी 2 गुन्हे दाखल करून आरोपी नोकराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार विरार येथील व्यापारी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची चार वर्षांची मुलगी गुरुवारी चारकोप, कांदिवली येथे त्यांच्या मेहुण्याकडे असताना ही घटना घडली.

तक्रारदाराच्या मेहुण्याने तिच्या पाच वर्षांच्या मुलाला, तक्रारदाराच्या मुलीला आरोपी नोकराकडे सोडले होते. दुपारी घरी कोणी नसताना आरोपीने दोघांवर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने दोन्ही मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

2 ते 3 दिवसांनी मुलांनी त्रास होत असल्याची तक्रार पालकांकडे केली. त्यावेळी पालकांना संशय आला. त्यांनी तात्काळ मुलांना डॉक्टरकडे नेले. त्यावेळी डॉक्टरने तपासणी करून मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला.

त्यानंतर पालकांनी मुलांना काय झाले याबद्दल विचारले. त्यानंतर त्यांनी पालकांना सर्व प्रकार सांगितला. पालकांनी चारकोप पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT