मुंबई

Crime News: काळ्या जादूच्या नावाखाली महिलेवर अत्याचार, ढोंगी बाबाला अटक

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: काळी जादू व जादू टोणा अवगत असल्याच्या बहाण्याने  महिलेवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबाला नयानागर पोलिसांनी अटक केली आहे.

ढोंगी बाबाने याचप्रकारे आणखी काही महिलांवर अत्याचार केले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली आहे. संतोष पोद्दार उर्फ विनोद पंडित असे या ढोंगी बाबाचे नाव आहे.

विनोद पंडित याने  हस्तरेखातज्ञ असल्याचे समाजमाध्यमावर पेज तयार केले होते. वैवाहिक समस्या तसेच नोकरीच्या समस्या पत्रिका बघून सोडवल्या जातील असे त्यात नमूद केले होते. मिरा रोड मध्येच त्याने कार्यालयही थाटले होते. 

मुंबईत राहणाऱ्या एका महिला नोकरीच्या शोधात होती.   फेसबुक वरील जाहिरात वाचून ती पंडित यांच्याकडे  गेली.  त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि तंत्रविद्या तसेच काळी जादू करण्याच्या नावाने  तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध बनवले. महिलेला नोकरीही लागली व महिलेचे लग्नही  झाले. त्यामुळे तिने बाबाशी संबंध कमी केले.

परंतु एका वर्षाने तिच्या लग्नात वैवाहिक समस्या निर्माण झाल्याने पुन्हा ती बाबाला भेटली. यावेळी बाबाने तांत्रिक विद्येच्या नावाने तिच्यावर नैसर्गिक तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले तसेच तिची अश्लील छायाचित्रेही काढली. 

या छायाचित्रांच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. अशा प्रकारे बाबाने तीन वर्ष तीच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर  कंटाळून महिलेने नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  पोलिसांनी ढोंगी बाबावर  बलात्कार तसेच महाराष्ट्र नरबळी आणी  अघोरी प्रथा उच्चाटन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

ढोंगी बाबाच्या मोबाईल मध्ये आणखी काही  महिलांची अश्लील छायाचित्रे पोलिसांना  आढळल्याने त्याने  आणखी काही महिलांवर याचप्रकारे अत्याचार केले असल्याची शक्यता नयानगर पोलिसांनी व्यक्त केली.

२०१९ मध्ये देखील बाब विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Latest Marathi News Live Update : वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रिपाईचे रास्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT