Suresh Mhatre Godown sakal
मुंबई

Thane News : सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या गोदामवर कारवाई; राजकीय दबावातून कारवाईची आरोप

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून गेल्या अनेक दिवसांपासून भिवंडी लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत खलबते सुरु होते.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून गेल्या अनेक दिवसांपासून भिवंडी लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत खलबते सुरु होते. त्यात गुरुवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांना भिवंडी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. या घोषणेला काही तास होत नाही तोच, त्यांच्या आर के लॉजी वर्ल्ड या गोदाम संकुलावर एमएमआरडीए कडून कोणतीही नोटीस न देता कारवाईचा घट घालण्यात आला होता.

मात्र, या बोडवून बाबत न्यायालयाकडून स्थगिती घेतली असल्याची माहिती देता, त्यांना खाली हात परतावे लागले. तर, हि कारवाई राजकीय दबावातून करीत असल्याची टीका सुरेश महत्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतून गुरुवारी सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून उमेदव्री जाहीर करण्यात आली. या उमेदवारीची घोषणा होत नाही, तोच महत्रे यांच्या भिवंडी येथील येवाई येथे असलेल्या आर के लॉजी पार्क गोदाम संकुलावर एमएमआरडीएकडून गुरुवारी सायंकाळी कोणतीही नोटीस न बजावता सिल करण्याची कारवाईसाठी आले होते.

यावेळी एमएमआरडीएचे अधिकारी पोलिस फौजफाटा घेऊन दाखल झाले. यावेळी सुरेश म्हात्रे यांच्या भागीदार सहकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतली असल्याची माहिती दिली. त्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेले एमएमआरडीएचे अधिकारी रिकाम्याहती परतले.

दरम्यान, यासंदर्भात सुरेश म्हात्रे यांना विचारले असता, मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून ९० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्ट्राचाराची जननी कपिल पाटील यांनीच घातली आहे, असा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केला.

एमएमआरडीए राजकीय दबावातून कारवाई करीत असून जिनके घर शिसे के होते है, ओ दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते अशा शब्दात सुरेश म्हात्रे यांनी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT