crime update uttar pradesh 22 year boy molest 6 year girl in dombivali mumbai police arrested accused  sakal
मुंबई

Dombivali : 22 वर्षीय नराधमाने 6 वर्षीय मुलीचा केला विनयभंग, आरोपी कुंदनला अटक

भावाच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याची वाकडी नजर पडली आणि त्याने जबरदस्ती तिचा विनयभंग केल्याची घटना

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - 22 वर्षीय नराधमाने 6 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. कुंदन हा मुळचा उत्तरप्रदेशचा असून डोंबिवली काही दिवसांपूर्वीच भावाकडे राहण्यास आला होता.

भावाच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याची वाकडी नजर पडली आणि त्याने जबरदस्ती तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी कुंदन चौहाण (वय 22) याला अटक केली असल्याची माहिती पोलिस उपनिरिक्षक आशा निकम यांनी दिली.

डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव परिसरात पिडीत 6 वर्षीय मुलगी कुटुंबासह राहते. पिडीत मुलीच्या आईने रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी सायंकाळी पिडीत मुलीची आई ही शेजाऱ्यांकडे गेली होती. यावेळी त्यांच्या लहान मुलाने त्यांना येऊन सांगितले की तिची मुलगी ही आरोपीच्या घरात गेली आहे.

पिडीत मुलीच्या आईने त्वरीत घराकडे धाव घेतली. त्यांच्या घराचा दरवाजा हा उघडा होता तर कुंदन याच्या घराचा दरवाजा हा बंद असल्याने त्यांनी त्याचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर त्यांच्या मुलीने रडत रडत घराचा दरवाजा उघडला. पिडीत मुलीच्या आईने मुलीला घरात नेऊन तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत काही झाले का ?

याची विचारणा केली असता. पिडीत मुलीने कुंदन हा तिला घरात घेऊन गेला, यावेळी तिचा भाऊ देखील होता. पिडीत मुलीच्या भावास त्याने शिवीगाळ करत तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला. हकीकत समजताच पिडीत मुलीच्या आईने त्वरीत रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आशा निकम व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला.

पोलिसांनी आरोपी कुंदन याचा शोध घेत रविवारी मध्यरात्री त्याला डोंबिवलीतून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी त्याची पोलिस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी कुंदन हा मजुरी करत असून तो काही दिवसांपूर्वीच डोंबिवली येथे त्याच्या भावाकडे राहण्यास आला होता अशी माहिती पोलिस उप निरिक्षक निकम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2000 Rs Note: तुमच्याकडे अजूनही 2,000 रुपयांच्या नोटा आहेत का? बदलण्याची शेवटची संधी; कशा बदलता येणार?

Circuit Bench Approved : संयम आणि चिकाटीचा अखेर विजय, सर्किट बेंच मिळाले; प्रगत भविष्याची मुहूर्तमेढ

'मुक्या जीवाचा खेळ केला, पैशांचं आमिष दाखवलं, पण अख्ख्या नांदणीचा जीव असलेली माधुरी ते कशी विकतील?' किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

Solar Eclipse: आज सूर्यग्रहण नाही, नासाने दिली माहिती, जाणून घ्या पुढचे पूर्ण सूर्यग्रहण कधी दिसेल?

Islamabad Express Accident : पाकिस्तानमधील लाहोरजवळ रेल्वेचा थरार! इस्लामाबाद एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, 30 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT