Mahadevi Elephant Relocation : कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला (Mahadevi Elephant) गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आलंय. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महादेवीला निरोप देताना नांदणी गावात हळहळ व्यक्त झाली. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी हत्तीणीला अश्रुपूर्ण निरोप दिला. गावातून मिरवणुकीने निरोप सोहळा पार पडला आणि अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.