Attack sakal
मुंबई

मुंबईत दोन प्राणिमित्रं आणि पोलिसांवर जमावाचा हल्ला

अवैध गोमांस घेऊन येणाऱ्या ट्रकला अडवल्यानं केला हल्ला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरात अवैध गोमांस घेऊन येणाऱ्या ट्रकला (Truck)अडवल्याने तिथल्या जवळपास 40 जणांच्या जमावाने दोन प्राणिमित्रांवर हल्ला केला. आज सकाळी चुनाभट्टीतल़्या (Lime kiln)कसाईवाडा इथे ही घटना घडली. चुनाभट्टी पोलिसांनी याबात गुन्हा दाखल करुन 7 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळी चुनीभट्टी परिसरातल़्या कसाईवाडी इथे बेकायदेशिर गोमांस विक्रीसाठी येणार असल्याची माहीती पशु कल्याण अधिकारी आशिष बारिक आणि प्रतिक नन्नावरे यांना मिळाली होती़.

त्यांनी ही बाब चुनाभट्टी पोलिस स्टेशनला कळवली, आणि छापा टाकण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. त्यानुसार रविवारी पहाटे दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह आशिष बारिक आणि पर्तिक नन्नावरे कलाईवाडीत पोलिसांच्या गाडीतुनच पोहोचले. माहीती मिळालेला ट्रक जसा कसाईवाड्यात आला आणि पोलिस आणि दोघे प्राणिमित्र त्या ट्रकला थांबवायला गेले, अचानक एक मोठा जमाव त्यांच्या दिशेने आला आणि पोलिसांना बाजूला ढकलून आशिष आणि प्रतिक यांच्यावर हल्ला केला़. आशिष यांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केल्याने त्यांना गंभीर जखम झाली, तर प्रतिक यांच्या पाठीवर वार केल्याने त्यांच्याही पाठीला गंभीर इजा झाली. आशिष बारिक यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चुनाभट्टी पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन 7 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.(Mumbai latest news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT