Cruise sakal mumbai
मुंबई

मुंबईत क्रूझ प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार

कृष्ण जोशी

मुंबई : देशात तसेच एकंदर जगातच क्रूझ प्रवासी वाहतूक (cruise travels) मोठ्या प्रमाणावर वाढणार असून त्याचे मुंबई (Mumbai) हे महत्वाचे केंद्र बनू शकते. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत मे महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषद (International cruise council) आयोजित केल्याची माहिती मुंबई पोर्ट अॅथॉरिटीचे अध्यक्ष राजीव जलोटा (Rajiv Jalota) यांनी आज येथे दिली. सागरमाला प्रकल्पामधील कामाचा आढावा घेताना ते पत्रकारांशी बोलत होते. क्रूझ पर्यटनाचा ट्रेंड वाढत असून त्यासाठी मुंबईत विशाल आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस बांधले जात आहे.

त्याद्वारे दरवर्षी दहा लाख प्रवाशांची तसेच दोनशे क्रूझची हाताळणी करता येईल. किमान पाचशे कोटी रुपये खर्चून सुसज्ज इमारत व सोयीसुविधा उभारल्या जातील. याचे बहुतांश काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल व तेव्हाच त्याचा मोठा भाग प्रवासी सेवेसाठी खुला करण्याचा विचार आहे. तर त्यानंतर इतर कामे पूर्ण झाल्यावर मार्च २०२४ मध्ये संपूर्ण टर्मिनस कार्यान्वित होईल, असेही जलोटा म्हणाले.

मुंबईत १४ व १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी तसेच किमान बारा मोठ्या क्रूझ कंपन्या सहभागी होणार आहेत. या परिषदेत क्रूझ पर्यटन, त्यातील आव्हाने, या क्षेत्राचा विकास, भवितव्य, मुंबईच महत्व आदी सर्व बाबींची चर्चा केली जाईल. मुंबई हे आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनात महत्वाचे ठिकाण होऊ शकते. मुंबईत क्रूझ बोटींची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. सन २०४० पर्यंत मुंबईत एकाचवेळी पाच क्रूझ बोटी उभ्या राहू शकतील, असे टर्मिनस बांधले जाईल, असेही जलोटा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT