Culprit arrested sakal media
मुंबई

उल्हासनगरातून अपहरण करून बलात्कार करण्यात आलेल्या मुलीची सुटका; आरोपी गजाआड

दिनेश गोगी

उल्हासनगर : चार महिन्यांपूर्वी शिकवणीला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण (Minor girl abduction) करून तिच्यावर बलात्कार (rape case) करणाऱ्या आरोपीला अहमदनगरातून बेड्या (culprit arrested) ठोकण्यात आणि मुलीची सुटका करण्यात हिललाईन पोलिसांना (hill line police) यश आले आहे. उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या हॉटेलमध्ये कुकचे काम करणाऱ्या इसमाची अल्पवयीन मुलगी 26 नोव्हेंबर 2021 रोजी शिकवणीला जाते असं सांगून घरातून गेली होती.

मात्र ती पुन्हा परतलीच नसल्याने तिची शोधाशोध करण्यात आली.शेवटी तिच्या वडिलांनी हिललाईन पोलिस ठाण्यात मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.पण तिचा मोबाईल स्विचऑफ असल्याने तिच्या लोकेशन बाबतचा कोणताही ठावठिकाणा पोलिसांना मिळत नव्हता.

अनोळखी फोनमुळे आरोपीच्या मुसक्या आवळल्या

दरम्यान याच भागात राहणाऱ्या एका तरुणाने तुमच्या मुलीला परत आणायचं असल्यास 50 हजार रुपये द्या अशी मागणी करणारा अनोळखी फोन मुलीच्या वडिलांना केला. हा फोन मुलीचं अपहरण करणाऱ्या तरुणाच्या मित्राने केल्याचं समोर आलं.तसंच ही मुलगी अहमदनगरला असल्याचं पोलिसांना समजलं.

त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते,सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी उपनिरीक्षक नवनाथ वाघमोडे,हवालदार संदीप बर्वे,प्रमोद कांबळे ही टीम अहमदनगर कडे रवाना केली.आणि अहमदनगर एमआयडीसी मध्ये सापळा रचून 19 वर्षीय आरोपी मंगेश सोनवणे याला अटक करण्यात आली.

ही टीम उल्हासनगरात आल्यावर मुलीला तिच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचे समोर आल्यावर आरोपी मंगेश सोनवणे याच्यावर अपहरणासह बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार (पोक्सो) विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला गुरुवार पर्यंत पोलीस कष्ठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रशासनाचा मोठा निर्णय! रात्री १२ ते सकाळी १० पर्यंत मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, पण कोणत्या मार्गावर?

Koyna Dam Water Release Update : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा! कोयनेचा विसर्ग वाढला; पहा किती क्युसेक वेगाने येतंय पाणी?

"माझ्या घरी दोन चिक्स.."! अरे ए माईक सुरूय... ड्वेन ब्राव्होला KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेने थांबवले... वादग्रस्त Video Viral

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

IPS Aparna Kaushik Video: कोण आहेत IPS अपर्णा कौशिक? १८ लाखांचे पॅकेज सोडून बनल्या 'लेडी सिंघम'; 'बॉडी शेमिंग'मुळे नवा वाद!

SCROLL FOR NEXT