मुंबई

विषमुक्त शेतीला दक्षिण रायगडमध्ये पालवी; वनप्रेमी किशोर पवार यांच्या पावलावर अनेक शेतकऱ्यांचे पाऊल

सुनिल पाटकर

महाड: शेतीमध्ये होत असलेला खतांचा व किडनाशकांचा अतिवापर शेतीला विषयुक्त करत आहे . अशा प्रकारचे अन्नधान्य खाल्ल्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. या मुळे विषमुक्त शेतीकडे अनेक शेतकऱ्यांनी वाटचाल सुरू केली आहे. महाड तालुक्‍यातील गावातील भिवघर गावातील वनप्रेमी 
किशोर पवार यांनी सात वर्षे विषमुक्त शेतीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक जण अशी शेती करण्यासाठी पुढे आले आहेत. 

कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. शेतातून मोठ्या प्रमाणात भात उत्पन्न मिळावे याकरता खतांचा वापर तसेच कीडनाशकांचा वापर अती प्रमाणात केला जातो. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढत असले तरी अशा शेतातून निर्माण होणाऱ्या धान्य सेवनामुळे अनेकांना कॅन्सर सारखे गंभीर आजार होतात, असे अभ्यासातून पुढे आले आहे. पंजाबमधील कॅन्सर ट्रेन याचे उदाहरण आहे. ही गंभीर समस्या पूर्ण देशाला सतावत आहे.

याला पर्याय म्हणून विषयुक्त शेतीकडे अनेक शेतकऱ्यांनी आपली वाटचाल सुरू केली आहे. असाच प्रयोग भीव घर येथील किशोर पवार यांनी सात वर्षांपासून सुरू केला आहे. भिवघर गाव वणवा मुक्त करण्यासाठी व येथील जंगल वाचवण्यात किशोर पवार यांचे मोठे योगदान आहे . ते वनप्रेमी संघटनेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था या व परिसरातील गावात वनरक्ष्णाचे काम करते. इतरांना विषमुक्त शेतीची शिकवण देण्यापेक्षा हा प्रयोग स्वतः करावा या भावनेतून 7 वर्षांपूर्वी आपल्या शेतामध्ये पवार यांनी विषमुक्त शेती प्रयोग सुरू केला. यात त्यांना अनेक अडचणी आल्या. गेले अनेक वर्ष पवार हे आपल्या शेतामध्ये केवळ शेणखताचा वापर करत आहेत. सर्व प्रकारची रासायनिक खते व कीटकनाशक बंद केलेली आहेत.

सुरुवातीच्या काळात त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. त्यांच्या शेतात भाताचे सरासरी उत्पन्न पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा कमी आले. परंतु पर्यावरणाच्या रक्षणासाठी धडपडणारे पवार यांनी माघार घेतली नाही. यासाठी त्यांनी हे नुकसान सोसत हा प्रयोग त्यांनी पुढे सुरू ठेवला. आता मागील काही वर्षांपासून विषमुक्त शेतीसाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांना यश येत आहे. आता भातातून त्यांना उत्पन्न चांगले मिळू लागले येत आहे. यावर्षीही पवार यांनी केलेली विषमुक्त शेती हिरवीगार झालेली आहे. सुमारे एक एकर क्षेत्रामध्ये त्यांनी ही भात पीक लागवड केली आहे. ते स्वतः शेतात राबतात. सध्या सेंद्रिय शेती पासून निर्माण केलेल्या उत्पादनाला सध्या चांगली मागणी आहे . शहरात सेंद्रीय तांदुळ चांगल्या किंमतीला विकला जातो त्यांचा हा प्रयोग पाहून गावातील अनेक शेतकरी आता विषमुक्त शेती करण्याकडे वळत आहेत. 

विषमुक्त शेती हा चांगला पर्याय आहे. शहरात या धान्याला चांगली किमत मिळते. मात्र, यासाठी संयम व कष्टाची तयारी पाहिजे. उत्पन्न वाढवण्याचा हा चांगला पर्याय आहे. 
- किशोर पवार,
शेतकरी

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fool Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो एप्रिल फूल्स डे? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

Ahilyanagar Murder Case: खूनप्रकरणी बापलेकाला शिक्षा; अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल, एकास सक्तमजुरी!

हीच तर खरी संस्कृती! प्रियांका चोप्राने सुवर्ण मंदिरात जमिनीवर बसून सगळ्यांसोबत घासली भांडी, देसी गर्लच्या सेवेचं कौतूक, Viral Video

SCROLL FOR NEXT