Cyclone Tej in Arabian Sea alert in mumbai when is it hitting City IMD alert marathi news  
मुंबई

Cyclone Tej : मुंबईवर घोंगावतंय 'तेज' चक्रीवादळाचे संकट, कधी धडकणार? शहराला कितपत धोका?

रोहित कणसे

अरबी समुद्रात येत्या २१ ऑक्टोबर रोजी 'तेज' हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या चक्रिवादळाचा परिणाम मुंबईत देखील जाणवण्याची शक्यता असून या पार्श्वभूमिवर भारतीय हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंजादानुसार याच्या संभाव्य पश्चिम-वायव्य मार्गामुळे मुंबईतील रहिवासी आणि प्रशासनाला सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

अरबी समुद्रातील या हवेच्या दबावामुळे मुंबई शहरात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात वेगाने वारे आणि मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे.

अग्नेय अरबी समुद्र आणि त्याच्या शेजारच्या लक्षद्वीप परिसरात चक्रीवादळाचा सतत प्रभाव दिसून येत आहे. समुद्रसमाटीपासून ३.१ किमी उंचीपर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे.

या चक्रीवादळाच्या सर्कुलेशनच्या प्रभावामुळे येत्या ३६ तासांमध्ये पूर्व-मध्य तसेच लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ऑक्टोबरपर्यंत मध्य अरबी समुद्रावर हवेचा दबाव अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरिन क्षेत्रात कमी ते मध्यम स्वरूपाचे विखुरलेल्या स्वरूपातील ढग तयार होत आहेत.

चक्रीवादळ तेज

पाण्याचे वाढलेले तापमान यामुळे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ विकसीत होण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा सर्वोत्तम काळ असते. तसेच २०२२ नंतरच्या मॉन्सून हंगामात अरबी समुद्रावर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निर्माण झाले नाहीत, याउलट सित्रांग आणि मंडौस या दोन उष्णकटिबंधीय वादळांनी बंगालच्या उपसागरात धडक दिली होता. त्यामुळेच अरबी समुद्रात हे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वाढते असा दावा करण्यात आला आहे.

हिंदी मगासागर क्षेत्रातील चक्रीवादळांना नाव देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पध्दतीनुसार जर भारतीय समुद्रात उष्णकटिबंधीय वादळ निर्माण झाले, तर त्याला तेज असे नाव दिले जाईल. मात्र स्कायमेट वेदरनुसार अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा मार्ग आणि वेळ ही अनिश्चित असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT